आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • रेल्वेत तरुणीने मागितली जागा, तर प्रवासी म्हणाला, मांडीवर बस ना! Video झाला Viral Girl Faced Unwanted Comments In Local Train In Kolkata Video Viral

रेल्वेत तरुणीने मागितली जागा, उद्धट प्रवासी म्हणाला, मांडीवर बस ना! Video झाला Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये रेल्वे प्रवासात एका तरुणीसोबत विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. पीड़िता सियालदाहपासून बॅरकपूरकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये आपल्या मित्रासोबत प्रवास करत होती. यादरम्यान तिने जागेवर बसण्यासाठी एका प्रौढ व्यक्तीला थोडेसे सरकायला सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने नकार दिला, म्हणाला की, माझ्यावर डोक्यावर पंखा लागलेला आहे. यामुळे सरकणार नाही. तुला जागा नसेल तर मित्राच्या मांडीवर बस ना! हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात असून त्या प्रवाशावर टीकेची झोड उठली आहे.

 

पीडितेने फेसबुक पोस्टमधून मांडले दु:ख

पीडितेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्यासोबत झालेली घटना शेअर केली आहे. पीड़िता म्हणाली की, रेल्वेमधील काही इतर प्रवाशांनीही एकानंतर एक अर्वाच्य शब्द वापरले. एक जण म्हणाला की, 'मुलींनी अशा प्रकारचे कपडे (जीन्स) घालू नये.'

पीड़ितेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले- 'मला खूप दु:ख झाले आहे, एका महिलेला असे अपशब्द ऐकावे लागतात, हाच आपला महान देश आहे का? हाच आपला आधुनिक समाज आहे का, जेथे महिलांना बस आणि रेल्वेमध्ये अभद्र व्यवहार सहन करावा लागतो?' पीड़ितेने रेल्वे पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल.

 

मेट्रो स्टेशनवर कपलला मारहाण
यापूर्वी एप्रिलमध्ये कोलकात्याच्या दमदम स्टेशनवर गर्दीने एका तरुण युगुलाला बेदम मारहाण केली होती. त्यांचा गुन्हा एवढाच होता की, त्यांनी खुलेआम एकमेकांची गळाभेट घेतली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Viral Video व Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...