आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: जन्मदाता बापच करायचा असे काही Girl Planned Father Murder With Boyfriend In Shamli

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक: जन्मदाता बापच करायचा असे काही; त्रस्त होऊन तरुणीने प्रियकराला दिली 'ही' शपथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी मुलगी व तिचा प्रियकर यांनी मिळून तिच्या वडिलांची हत्या केली. - Divya Marathi
आरोपी मुलगी व तिचा प्रियकर यांनी मिळून तिच्या वडिलांची हत्या केली.

(शामली) यूपी - येथे 7 एप्रिलला झालेल्या हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, मर्डरची मास्टरमाइंड मृत व्यक्तीची मुलगीच निघाली. तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून हे भयंकर कृत्य केले. आरोपींनी गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.


CCTV मधून पटली आरोपीची ओळख
- शामलीच्या दयानंद नगरचे रहिवासी राकेश कुमार दिल्लीच्या जीबी पंत हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्नीशियन म्हणून कार्यरत होते. 7 एप्रिल रोजी हॉस्पिटलमधून घरी परतताना त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.
- पोलिसांनी जेव्हा त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक केले तेव्हा मृत व्यक्तीचा पाठलाग करताना दोन तरुण दिसले. फुटेजच्या आधारो सर्वात आधी शामलीच्या हाजीपूरचा रहिवासी समीरला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच समीरने पूर्ण हत्याकांडाची धक्कादायक हकिगत सांगितली.

 

शाळेतील मैत्रिणीवर जडले फेसबुकवरून प्रेम
- आरोपी समीर म्हणाला, काव्या (ऊर्फ वैष्णवी) आणि मी 10वीत एकत्र शिकतो. मग आमची फेसबुकवर चॅटिंग सुरू झाली. मी तिच्यावर प्रेम करत होतो. ती सांगायची की, तिचे वडील तिला खूप मारहाण करतात, सारखी नजर ठेवतात. ते आम्हा दोघांना भेटूही देत नव्हते. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे, तिच्या नावाचा टॅटूही मी हातावर गोंदवून घेतलेला आहे.
- दरम्यान आमच्या दोघांचे बोलणे बंद झाले. यानंतर तिने फोन करून मला सांगितले की, मी जर तिच्या बापाचा खून केला, तर आपले लग्न होऊ शकते. मला ती पाहिजे होती, यामुळे मी तिचे सर्व ऐकले. 

 

बेल्टने मारायचा बाप, पिरगाळायचा हात
- दुसरीकडे मृताची मुलगी वैष्णवी ऊर्फ काव्याने सांगितले, पप्पा नेहमी मला आणि माझ्या आईला मारहाण करायचे. कधी-कधी माझ्या हाताला जोरात चावायचे, कधी बोटे पिरगाळायचे. बेल्टने तर नेहमी डोक्यावर मारायचे. त्यांनी सांगितलेले काम करायला थोडाही उशीर झाला की, आईला बेदम मारहाण करायचे. ऑफिसमधला राग घरी येऊन काढायचे. रोजच्या कटकटीमुळे मी त्रस्त झाले होते.
- समीरशी माझी फेसबुकवर मैत्री झाली होती. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करायचो. परंतु वडिलांच्या मारहाणीमुळे खूप दु:खी झाले होते. यामुळे मी समीरसोबत मिळून त्याचा मर्डर केला.

 

काय होती पूर्ण प्लॅनिंग?
- मृत राकेश यांच्या हॉस्पिटलला जाण्याचा आणि घरी परतण्याचा पूर्ण शेड्यूल वैष्णवीने समीरला सांगितला होता. या कामासाठी समीने आपल्या चुलत भाऊ शादाबलाही सोबत घेतले.
- मृत आपल्या घरात एक बंदूक आणि काडतूस ठेवायचा. त्यांच्या मुलीने ती बंदूक चोरून आपल्या प्रियकराला दिली.
- 7 एप्रिल रोजी मृत राकेश ड्यूटीवरून घरी परतत होते. घरापासून थोड्याच अंतरावर समीर आणि शादाबने त्यांचा पाठलाग केला आणि संधी पाहून शादाबने गोळी झाडली. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
- पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. आता या पूर्ण घटनाक्रमाची बारकाईने चौकशी केली जात आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर प्रकरणाचे आणखी फोटोज व शेवटी व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...