आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking! नवरदेवाला आली टॉयलेट... लग्नाच्या काही तासातच विधवा झाली नवरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर नवरेदव नवरीला घेऊन घरी जात होता. - Divya Marathi
लग्नानंतर नवरेदव नवरीला घेऊन घरी जात होता.

आग्रा (यूपी) - येथे नवरीच्या पाठवणीनंतर तिला घरी घेऊन जात असलेल्या नवरदेवाला टॉयलेटला जाणे जिवावर बेतले. टॉयलेटनंतर परत येताना भरधाव ट्रकने नवरदेवाला चिरडले. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. भीषण अपघाताचे दृश्य पाहताच नवरी बेशुद्ध झाली. घटनेनंतर दोन्ही लग्नघरी शोककळा पसरली आहे.

 

ढाब्यावर थांबवली गाडी, टॉयलेटसाठी पार केला रस्ता मग...
- रविवारी आग्राच्या ईदगाह परिसरात राहणारे विमल यांचे वऱ्हाड सैयाँ येथील लाखन जाटव यांच्या घरी आले होते.
- लखन सांची मुलगी सरिताचे लग्न विमलसोबत होत होते. रात्रभर लग्नविधीनंतर वधुपक्षाने नवरदेव आणि त्यांच्या नातेवाइकांना दुपारची जेवणे केली आणि 3 वाजेच्या सुमारास नवरीची पाठवणी करण्यात आली.
- नवरदेव विमल आणि नवरी सरितासोबत इतर 3 जण कारमध्ये बसून घराकडे निघाले होते.
- वाटेत कुरंचीतपूर वळणावर नवरीला बसल्याने उलटी होऊ लागली, तेव्हा गाडी एका ढाब्यावर थांबवण्यात आली.
- ढाब्यावर गाडी थांबवल्यावर नवरदेव विमल टॉयलेट करण्यासाठी रोड क्रॉस करून गेला.

चिरडून गेला भरधाव ट्रक, रस्त्यावरून गोळा करावे लागले बॉडी पार्ट्स
- टॉयलेट झाल्यानंतर विमलने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिले नाही आणि रस्ता क्रॉस करू लागला. तेवढ्यात भरधाव ट्रकने त्याला चिरडले. 
- अपघात एवढा भीषण होता की, विमलच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आणि त्याच्या शरीराचे अवयव विखुरले गेले. पोलिसांना मृतदेहाचे तुकडे रस्त्यावरून खरवडून गोळा करावे लागले.
- हे भयंकर दृश्य पाहताच नवरी बेशुद्ध झाली. कुटुंबीयांचे रडून रडून हाल झाले.

 

घरातला मोठा मुलगा होता विमल 
- विमल आपल्या घरात सर्वात मोठा होता. त्याला दोन लहान भाऊ संजीव आणि अनिल आहेत.
- अपघाताच्या एवढ्या भीषणतेमुळे स्थानिक लोक संतप्त झाले, त्यांना चक्का जाम करून ट्रक ड्रायव्हरला पकडण्याची मागणी केली.
- पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला शांत केले आणि अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
- एसएसपी अमित पाठक म्हणाले की, या परिसरात एका भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. त्या तरुणाचे त्याच दिवशी लग्न झाले होते. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचा शोध घेतला जात असून लवकरच त्याला जेरबंद करू.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज व शेवटी व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...