आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनई चौघडा वाजला नाही, नातेवाईक आले नाही, नवरदेवाने रडतच घेतले सात फेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - नवरदेव हेमंत पटनेचा जेव्हा जोधपूर मध्ये रितुसोबत सात फेरे घेण्यासाठी आला तेव्हा ना सनई चौघाडा वाजला ना लग्नात कोणी नातेवाईक उपस्थित होते. नवरा-नवरीच्या डोळ्यामंध्ये आसवे होती आणि मंडपात त्यांना धीर देणारे मित्र आणि एक वयस्कर नातेवाईक एवढेच उपस्थित होते. अत्यंत शोकाकूल वातावरणात नवरीच्यामुलीच्या घरच्यांनी आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी केली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने लग्नघरी शोककळा पसरली. 

 

शोकमय वातावरणात पार पडले लग्न

हेमंतने लाल रंगाचा चौकडा शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती. हेमंत जेव्हा परिहारनगरातील सावलगढ गार्डन मध्ये लग्नासाठी कार घेउन पोहचला. गाडीतून उतराच त्याच्या डोळ्यांमध्ये लग्नाच्या आनंदाएेवजी आपली माणसं दूर जाण्याचे दु:ख दिसत होते. द्वारा जवळ उभी असणारी त्याची सासू कांचन आणि मोठी सासू रेखा तसेच अन्य महिलांनी सांत्कवन करत त्याला शांत केले. लगेच फेरे घेण्यासाठी लग्नमंडपात नेले. फेरे घेताना हेमंत आणि रितु यांच्या डोळ्यातील आसवे थांबत नव्हती. नातेवाईक त्यांना गप्प करण्याचे पूरेपूर प्रयत्न करत होते. त्यांनी अडखळतच फेरे घेतले आणि हेमंत ने काप-या हातांनी रितुला कूंकू लावले. यावेळी कुणी मंगलगीत गायले नाही ना कोणी बधावणा दिली नाही. एवढच नाही तर नवरदेवाने पाणी सुद्धा घेतले नाही. प्रथेचा मान राखत मिठाईच्या नावावर फक्त गुळाचा एक तुकडा तोंडात टाकला. फक्त पाऊण तासात फेरे उरकले आणि हेमंत आपल्या अर्धांगिणीला घेऊन नातेवाईंकाकडे गेला. हेमंतचा मेव्हणा पवन देखील त्यांच्यासोबत गेला आणि अापल्या बहिणीला लगेच तेथून परत घेऊन आला. 


येणार होते 200 व-हार्डी, घटनेची माहिती मिळताच परतले 

सोजतीगेट सुर्या हाॅटेल जवळ सिलाई मशीनचे व्यापारी लक्ष्मण देवडा यांची मुलगी रितु आणि हेमंतच्या लग्नासाठी त्याच्या घरच्यांनी 200 नातेवाईक येण्यार असल्याचे कळविले होते. यासाठी शुक्रवारीच मिठाई बनवली होती. परंतू रितुचे वडिल लक्ष्मण देवरा आणि मोठे चुलते शंकरलाल यांना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता दुर्घटनेची माहिती मिळाली आणि सगळं काही थांबवावं लागलं. महिला संगीत आणि बिंदोलीचा कार्यक्रम ही रद्द करावा लागला एवढंच नाही तर कुणी जेवलंसुध्दा नाही. निम्मे नातेवाईक तर घटनेची माहिती मिळताच परतले. 


एकाच मंडपात होते दोन बहिणींचं लग्न 

रितु सोबत तिची लहान बहीण सुप्रियाच देखील लग्न चौपासनी हाउसिंग बोर्ड निवासी सुमेर सोबत झालं. सुप्रियाची वरात सायंकाळी आली तर रितुचं लग्न घटनेनंतर शनिवारी दुपारी 2 वाजता झालं. मुहूर्त साडेदहाचा होता. 


रद्द केला बिलाडाला जायचा कार्यक्रम 

बिलाडा येथील शिंपी समाजाच्या भवनात नवरा नवरीला घेऊन जाण्याचा कार्यक्रम होता पण हेमंतच्या तब्येतीमुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला। तिथे रितुचं तोंड गोड करण्याचा कार्यक्रम होता पण तो झालाच नाही. 

 

केव्हा काय झालं ? 

दुपारी 1.45 वाजता हेमंत सरळ तोरणद्वारी पोहचला.
दुपारी 2.00 गणेश पुजा आणि हथळेवा जोडला. 
दुपारी 2.27 वाजता सात फेरे घेतले
दुपारी 2.44 वाजता हेमंत ने रितुला कुंकू लावले आणि काही प्रथा पुर्ण केल्या
दुपारी 2.50 वाजता बोहल्यावरुण खाली आले.
दुपारी 3.00 वाजता दोघे बाहेर निघाले
दुपारी 3.15 वाजता हेमंत रितुला घेऊन सूरसागर येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला. 


बचावकार्य अजून सुरुच, नवरादेवाची आईही बेपत्ता

शहरातील नंदनगरमधील कुमावत समाजाच्या भवन मध्ये झालेल्या सिलेंडर ब्लास्टमधील मृतांचा आकडा वाढून 9 झाला आहे. तर दहा लोक अजून गायब आहेत यामध्ये नवरदेवाची आई आशादेवी देखील आहे. एनडीआरएस आणि एसडीआरएफचे जवान अजूनही राडारोडा काढताहेत. राड्यारोड्याखाली अजूनही काही लौक दबले असल्याची भिती आहे. 


मृतांच्या नातेवाईंकाना दोन दोन लाखांची घोषणा 

-राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे पिडीत परिवाराचं सांत्वन करण्यासाठी शनिवारी सायंकाळी हेलीकाॅप्टरने ब्यावर येथे पोहचल्या आणि नंदनगर मध्ये उध्वस्त झालेल्या भवनात जाऊन पिडितांच्या नातेवाईंकाशी बातचीत केली त्यांना धीर दिला. जिल्हाधिकारी गौरव गोयल यांनी त्यांना पुर्ण घटनाक्रमाची माहिती दिली व बचावकार्याबद्दल माहिती सांगितली. मुख्यमंत्री यानंतर हेमंत पाटलेचाच्या घरी पोहचल्या आणि माहिती घेतली. यानंतर त्या दुर्घटनेतील जखमींना भेटण्यासाठी अमृतकौर हाॅस्पीटलमध्ये गेल्या. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाखांची मदत देण्याची घोषणा केली. 


बेपत्ता असलेल्यांची नावे

नंदनगर मधील सुरेंद्र यांची पत्नी आशादेवी (50), संजय पाटलेचा, कुलदीप, (19) पिपाड येथील वसंत सलोनी, बिराटिया येथील जगदीश सोलंकी, पवन सोलंकी, शीला देसाई, हेमलता कुमावत, आचारी मनोहरलाल ची पत्नी आयुची, मुलगा जगदीश यांचा अजून पत्ता लागलेला नाही.

 

6 जणांचा अजमेरमध्ये उपचार सुरू 

ब्यावर येथील शाहपुरा मोहल्लातील रहिवासी ओमप्रकाश, संजय, गजेंद्र सिंह, मांगी देवी, अमित, आशादेवीचा अजमेर मधील हाॅस्पीटल मध्ये इलाज सुरु आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...