आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • जगातील सर्वात महागडी आहे ही Bike, एवढे हायटेक आहेत फीचर्स ! Harley Davidson Blue Edition The World’S Most Expensive Bike

जगातील सर्वात महागडी आहे ही Bike, एवढे हायटेक आहेत फीचर्स !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच हार्ले-डेविडसनची ब्लू एडिशन बनून तयार झाली आहे. हिला जगातील सर्वात महागडी बाइक मानले जात आहे. या बाइकला स्‍वि‍स वॉच, ज्वेलरी कंपनी Bucherer आणि बाइक स्पेशालिस्ट Bündnerbike यांनी मिळून बनवले आहे. या यूनिक बाइकची किंमत जवळपास 12.2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या बाइकच्या निर्मितीसाठी 2500 तासांपेक्षाही जास्त वेळ लागला आहे. हार्ले-डेविडसन ब्लू एडिशनला Bucherer आणि Bündnerbike यांच्या 8 जणांच्या टीमने मिळून तयार केले आहे. या बाइकला झुरिच, स्वित्झर्लंडमध्ये सादर करण्यात आले होते.

 

अनेक पार्ट्स आहेत गोल्ड प्लेटेड
हार्ले-डेविडसनची ब्लू एडिशन Harley-Davidson Softail Slim S वर आधारित आहे. याचे फ्रेम आणि रिम्स कस्टम मेड आहेत. या बाइकचे बहुतांश पार्ट्स गोल्ड प्लेटेड आहेत. या बाइकच्या फ्यूएल टँकमध्ये उजव्या बाजूला एक घड्याळही ठेवण्यात आले आहे. ही अशी पहिली बाइक आहे ज्यात फॅक्टरीतूनच वॉच देण्यात आली आहे. या बाइकच्या अनेक पार्ट्समध्ये प्रीमियम मेटल आणि ज्वेलरीचा वापर करण्यात आला आहे.  याच्या फ्यूएल टँकमध्ये 5.40 कॅरेट डिजलर रिंग देण्यात आली आहे. याच्या इंजिनाबाबत बोलायचे झाल्यास यात 1.8 - लिटर एअर कूल्ड V-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 128Nm चा टॉर्क जनरेट करते. याला ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. या बाइकमध्ये 6 लेयरची सीक्रेट कोटिंग करण्यात आली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडिओ व कशी दिसते ही 12.2 कोटींची Bike...

बातम्या आणखी आहेत...