आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाईप्रोफाइल सेक्स रॅकेटमधून भोजपुरी अॅक्ट्रेसची सुटका, हैदराबादेतील 5 स्टार हॉटेलवर पोलिसांची धाड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद  - येथील पॉश परिसर बंजारा हिल्समधील एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून 3 दलाल आणि एका कस्टमरलाही अटक केली आहे. यात एक 24 वर्षीय भोजपुरी अॅक्ट्रेसही सामील होती. तिची पोलिसांनी सुटका केली. अॅक्ट्रेस आग्राची रहिवासी आहे. तर रंगेहाथ पकडण्यात आलेला ग्राहक एक सरकारी कर्मचारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची त्यांना गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर येथे धाड टाकण्यात आली. रॅकेटच्या सूत्रधारासह एक ग्राहकाला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी जनार्दन राव काम देण्याच्या बहाण्याने मुंबई, दिल्लीसहित अनेक शहरांतील अॅक्ट्रेसेसना बोलवायचा आणि त्यांचे लैंगिक शोषण घडवून आणायचा. आरोपी राव हा आठवड्याच्या मानधनावर तरुणींना घेऊन यायचा व त्यांना एका आठवड्याचे 1 लाख रुपये देऊन देहव्यापार करायला लावायचा. यासाठी तो ज्या तरुणींना मॉडेलिंग आणि चित्रपटसृष्टीत करिअर करायचे आहे अशा तरुणींना हेरायचा. असे करून आरोपीने आतापर्यंत हजारो तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे.

तथापि, डिसेंबर 2017 मध्येही हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. त्या वेळी 2 स्टार हॉटेलवर अशीच धाड टाकून 2 अॅक्ट्रेसेसना अटक करण्यात आली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos व video... 

 

बातम्या आणखी आहेत...