आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साहेब, काय करू? अॅम्ब्युलेन्ससाठी पैसा नाही'; जखमी पत्नीला असे नेले हातगाडीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हापूड (यूपी) - शहरात एक महिला छतावरून पडल्याने गंभीर जखमी झाली. गंभीर अवस्थेत पतीने आपल्या हातगाडीवर तिला रुग्णालयात नेले.  यादरम्यान त्यांची कुणीही मदत केली नाही. जेव्हा त्यांना सरकारी अॅम्ब्युलन्स बोलवा असे सांगण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, मला याचीही माहितीच नाही.


अॅम्ब्युलेन्ससाठी नव्हते पतीकडे पैसे...
- पती हबीबने सांगितले की, पत्नी छतावरून पडली होती. मला वाटले की, अॅम्ब्युलेन्ससाठी पैसे लागतात, म्हणून हातगाडीवरच तिला टाकले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की अॅम्ब्युलेन्समध्ये तिला नेऊ शकेन.
- दुसरीकडे, जेव्हा हबीबला सरकारच्या मोफत अॅम्ब्युलेन्स सेवेबाबत विचारले तर तो म्हणाला की, मला याची माहितीच नाही.
- सीएमओ ए. के. सिंह म्हणाले की, अशा घटनांमध्ये 108 अॅम्ब्युलेन्सला कळवले जाते. पण एखाद्याने फोनच केला नाही तर अॅम्ब्युलेन्स तिथे जाईल कशी.
- दरम्यान, हबीब जखमी पत्नीला हातगाडीवरून नेत असताना लोक फक्त पाहत होते, पुढे होऊन त्यांना कुणीही मदत केली नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे फोटोज व व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...