आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती घराबाहेर जाताच पत्नी करायची हे काम, रंगेहाथ पकडल्यावर झाला खुलासा, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. जो पाहून प्रत्येक जण चकित होत आहे. हैदराबादेत चारमिनार पोलिसांनी एका महिलेला चोरीच्या आरोपावरून अटक केली आहे. चोरीमागचे कारण तुम्हीही शॉक्ड व्हाल. आएशा सिद्दीकी हिचे चोरी करण्याचे कारण खूप वेगळे आहे. आएशा तशी तर गृहिणी, परंतु ऐशआरामाचे जीवन जगण्यासाठी चोऱ्या करायची.

 

आएशाचा पती जॉब करतो. तो सकाळी ऑफिसला गेला की, त्याच्या मागोमाग पत्नीही चोऱ्या करण्यासाठी घराबाहेर पडायची. तिच्या नवऱ्याला याची साधी माहितीही नव्हती. पती घरी येण्यापूर्वी ती घरी परतायची. पोलिस म्हणाले, पतीच्या कमी पगारामध्ये तिची हौसमौज होत नव्हती. यामुळे तिने चोऱ्या करायला सुरुवात केली. जेव्हा-जेव्हा तिला पैशांची गरज भासायची ती एखाद्या दुकानात जाऊन रोख रक्कम आणि दागिन्यांवर डल्ला मारायची. परंतु या वेळी तिला रंगेहाथ पकडण्यात आले.

 

असे पकडले आएशाला
मिटिका शेरमध्ये वेद ज्वेलर्स शॉपवर आएशा ग्राहक बनून पोहोचली. तेव्हा तिने बुरखा घातलेला होता. सर्वात आधी तिने दुकानदाराला सोन्याचे दागिने दाखवण्यासाठी सांगितले. जेव्हा त्याने दागिने दाखवले तेव्हा तिने हळूच 40 ग्रॅमचे दागिने चोरले. आरोपी आएशाकडून सोन्या-चांदीचे 1 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

 

ती चोरी करण्यासाठी महागड्या रेस्टॉरंटमध्येही जायची. चोरीच्या पैशांनी भरपूर शॉपिंग करायची. परंतु या वेळी सीसीटीव्हीमुळे तिची चोरी लक्षात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर Hyderabad Tube News ने शेअर केलेला आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, चोरीचा हा व्हायरल व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...