आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजला येणाऱ्या व्हॉलीबॉल प्लेअरच्या डोक्यावरून गेले ट्रकचे टायर, वडिलांच्या हातामध्ये मुलीने सोडला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर : सोमवारी सकाळी भीषण दुर्घटनेत 17 वर्षीय नवनीत कौर जागीच ठार झाली. ओव्हरटेक करत असलेल्या ट्रकने बाइकला धडक दिली आणि नवनीत यामध्ये सापडली. पठाणकोटच्या कन्या महाविद्यालयात शिकणाऱ्या नवनीतला वडील अजित सिंह उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यामुळे बाइकवरून हॉस्टेलवर सोडण्यासाठी निघाले होते. जालंधरच्या बस्ती बावा खेल कालव्याजवळ अचानक पाठीमागून ओव्हर स्पीड ट्रक हॉर्न न देता जवळ आला आणि बाइकला धडक दिली. वडिलांच्या डोळ्यासमोर मुलीने जीव सोडला तर अजित यांना किरकोळ दुखापत झाली.


दुसरे नॅशनल टूर्नामेंट खेळण्याची तयारी करत होती
- केएमव्ही कॉलेजमध्ये 12 वीमध्ये आर्टस्चे शिक्षण घेत असलेली नवीन व्हॉलीबॉलच्या टीममध्ये होती.


- भाऊ मनकीरतने सांगितले की, त्याच्या बहिणीने या खेळासाठी जालंधरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले होते. तिच्या उत्कृष्ट खेळामुळे तिने कॉलेजच्या व्हॉलीबॉल टीममध्ये आपले स्थान निश्चत केले होते.


- केएमव्ही कॉलेजच्या हेड ऑफ स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे आशु बजाज यांनी सांगितले की, नवनीतने कॉलेजमध्ये व्हॉलीबॉल टीममधून एक स्टेट टूर्नामेंट खेळले होते आणि नॅशनल टूर्नामेंट खेळण्याची तयारी करत होती. टीममधील बेस्ट खेळाडूंपैकी एक ती होती.


पंतप्रधानाच्या मलोट रॅलीसाठी 50 ट्रॅफिक पोलीस, सकाळी अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना ट्रकची एंट्री 
- कपूरथला रोडवर सकाळी सहा वाजल्यानंतर अवजड वाहनांना बंदी आहे परंतु या गाड्या थांबवण्यासाठी एकही नाका नाही.


- एसीपी ट्रॅफिक हरविंदर सिंह भल्ला यांनी सांगितले की, शहरात अवजड वाहनांना प्रवेश नाही. पंतप्रधानांची 11 जुलैला मलोट येथे रॅली असल्यामुळे 50 ट्रॅफिक पोलिसांची ड्युटी तेथे लावण्यात आली आहे. पोलिसांच्या कमीमुळे हा प्रॉब्लेम झाला आहे.


- सकाळी 11 वाजता वाळूने भरलेल्या ट्रकची एंट्री येथे होऊच शकत नसल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. यासोबतच हे पहिल्यांदाच झाले नसून या रोडवर नेहमीच अवजड वाहन येत राहतात.


- ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा फोटो आणि व्हिडीओ...

बातम्या आणखी आहेत...