आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांचा बुधवारी साखरपुडा झाला. राजकारणांव्यतिरिक्त दोन्ही कुटुंबाच्या या आनंद सोहळ्यात फक्त काही निवडक पाहुणी हजर होती. चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असल्याने लालू साखरपुड्याला हजर राहू शकले नाहीत. तेजप्रतापचे लग्न माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्याशी होत आहे. हा साखरपुडा मौर्या हॉटेलच्या अशोक हॉलमध्ये झाला.
अंगठी घालताना लाजला तेजप्रताप..
- साखरपुड्याला लालूंच्या कुटुंबातून त्यांच्या पत्नी माजी सीएम राबड़ी देवी, मुलगा तेजस्वी यादव, मुलगी मीसा भारती यांच्यासह इतर मुलेही हजर होती.
- वाग्दत्त वधू ऐश्वर्याला अंगठी घालताना तेजप्रताप खूप लाजत होते. वास्तविक, त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना पाठीमागून सारखे चेहऱ्यावर स्मित ठेवण्यासाठी सांगत होते. जेव्हा ते ऐश्वर्याच्या उजव्या हातात अंगठी घालू लागले तेव्हा बहिणींनी डाव्या हातात घालण्याचा इशारा केला.
-राबडी यांनी सांगितले की, लालू या कार्यक्रमात आले असते, तर खूप बरे झाले असते. दुसरीकडे, मुलगी मीसा भारतीने म्हटले की, वडील आले असते तर कार्यक्रमात आणखी रंगत आली असती.
- ही पहिलीच अशी वेळ आहे, जेव्हा लालूंच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबात एखादे मंगलकार्य झाले आहे.
- लग्न 12 मे रोजी होणार आहे. यापूर्वी 5 एप्रिल तारीख ठरली होती. यासाठी लालूंच्या वतीने पॅरोलची अपील केली जात आहे.
- साखरपुड्यापासून राजकीय चेहऱ्यांना दूर ठेवण्यात आले होते. यात दोन्ही कुटुंबाची मंडळी आणि काही खास जवळचे नेते सहभागी होते.
यामुळे कैदेत आहेत लालू
- चारा घोटाळ्याच्या 4 प्रकरणांत दोषी आढळल्याने लालू जेलमध्ये बंद आहेत. किडनीमध्ये स्टोन, रक्तसंक्रमण आणि इतर आजारांनी पीडित लालू सध्या दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेत आहेत.
- उल्लेखनीय आहे की, देवघर ट्रेझरी केसमध्ये 6 जानेवारी 2018 रोजी लालूंसहित 16 आरोपींना साडे 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- 17 मार्च रोजी तब्येत बिघडल्याने लालूंना रांचीच्या रिम्स रुग्णालयात नेण्यात आले. तेथून नंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना एम्समध्ये हलवण्यात आले.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, लालूंची सून ऐश्वर्या रायबाबत खास माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.