आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • लेस्बियन तरुणींचा पोलिसांत गोंधळ: 'आमचे लग्न लावून द्या, नाहीतर आत्महत्या करू..' Lesbian Girls Threatens Police In UP Shocking News And Updates

लेस्बियन तरुणींचा पोलिसांत गोंधळ: 'आमचे लग्न लावून द्या, नाहीतर आत्महत्या करू..'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाच ब्यूटी पॉर्लरमध्ये काम करताना दोघींचे जडले प्रेम.

महिला पोलिसांना सोपवण्यात आले प्रकरण.

 

मथुरा, यूपी - येथे 2 तरुणींनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांना आपल्या लग्नासाठी सुरक्षा हवी आहे. यादरम्यान त्यांचे कुटुंबही पोलिसांत गेले आणि दोघींनाही त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. तथापि, दोघींना महिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

- लक्ष्मीनगरमध्ये एकाच ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या 2 तरुणी आपसात लग्न करण्याच्या मागणीसाठी सोमवारी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्या. त्यांनी पोलिसांना त्यांचे लग्न लावून देण्यासाठी, तसेच त्यांना सुरक्षा देण्यासाठी अर्ज दिला. 
- दोन्ही तरुणींनी धमकी दिली की, जर त्यांचे लग्न लावण्यात आले नाही, तर त्या आत्महत्या करतील. याची माहिती मिळताच दोघींचे कुटुंबीयही पोलिसांत पोहोचले. त्यांनी दोघींची समजूत घालून त्यांना घरी नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बधल्या नाहीत. शेवटी दोघींचे कुटुंब नाराज होऊन तेथून परत निघून गेले. यानंतर हे प्रकरण महिला पोलिसांना सोपवण्यात आले. 

- लक्ष्मीनगरमधील रहिवासी शिवानी( 20) आणि दीप्ती (18) लक्ष्मीनगरच्या रामदुलारी मार्केटमधील दीप्ति ब्यूटीपार्लरमध्ये काम करतात. त्या मागच्या 3 वर्षांपासून एकमेकींवर प्रेम करतात. महिला पोलिसांत दीप्ति म्हणाली की, पोलिसांनी त्यांचे लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले आहे.
- शिवानीने फिल्मी स्टाइलमध्ये म्हटले- 'प्यार करना कोई गुनाह नहीं है। हमें किसी से कोई मतलब नहीं हैं। हमने आपस में प्यार किया है और एक साथ रहना चाहते हैं।' 
- शिवानी पोलिस स्टेशनमध्ये मुलासारखी वेशभूषा करून आली होती.

- SP सिटी श्रवण कुमार म्हणाले की, तरुणींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतरही जर त्या ऐकल्या नाहीत, तर पुढील कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्वर पाहा, या धक्कादायक घटनेचा Video... 

बातम्या आणखी आहेत...