आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90 दिवसांत 3300 Calls, लष्करी अधिकाऱ्याच्या बायकोमागे वेडा झाला होता मेजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - राजधानी दिल्लीत मेजर अमित द्विवेदीची पत्नी शैलजा हत्याकांड प्रकरणी सोमवारी आणखी एक खुलासा झाला. त्यानुसार, शैलजासाठी आरोपी मेजर निखिल हांडा अक्षरशः वेडा झाला होता. त्याने गेल्या 3 महिन्यात पीडित शैलजाला तब्बल 3300 कॉल केले होते. दिल्ली पोलिसांनी आरोपी मेजरला मेरठ येथून अटक केली. तसेच पतियाळा हाऊस कोर्टमध्ये झालेल्या सुनावणीत त्याला 4 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित असलेला निखिल कुठल्याही परिस्थितीत शैलजाशी लग्न करण्याच्या नादात होता. तिने लग्नास नकार दिल्यानंतर निखिलने तिला वारंवार फोन लावले. पोलिसांनी शैलजाच्या मोबाईलमधून काही महिन्यांचा कॉल डीटेल रेकॉर्ड (CDR) काढला. त्यामध्ये निखिलने शैलजाला केलेले 3800 कॉल आणि मेसेजेस सापडले आहेत. त्याने 3 महिन्यांमध्ये शैलजाला तब्बल 3300 कॉल लावले होते. 

 

मित्राच्या पत्नीला केले होते प्रपोज...
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शैलजा आणि मेजर निखिल एकमेकांना 2015 पासून ओळखत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. वेळोवेळी हे दोघे एकमेकांशी फोनवर गप्पा मारत होते. निखिल शैलजाचा पती मेजर अमितचा मित्र होता. हे दोघे नागालँडच्या दीमापूर येथे कार्यरत होते. निखिलने काही दिवसांपूर्वीच शैलजाकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. परंतु, शैलजाने या लग्नास स्पष्ट नकार दिला. प्रस्ताव फेटाळल्यानंतरही निखिल तिच्यावर वारंवार दबाव टाकत होता.


जखमी झाल्याचे कळताच दिल्लीला पोहोचला...
याच महिन्याच्या सुरुवातीला शैलजाच्या पायात दुखापत झाली होती. यानंतर तिला दिल्लीच्या आर्मी कॅन्ट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यासंदर्भातील माहिती निखिलला मिळाली. तेव्हा त्याने दीमापूरहून थेट दिल्ली गाठली. कथित मायग्रेनचा बहाणा करत तो सुद्धा याच रुग्णालयात दाखल झाला. त्या ठिकाणी त्याने आपल्या मुलाला सुद्धा उपचारासाठी दाखल केले होते. जो अजुनही रुग्णालयातच आहे.


पुन्हा तोच प्रस्ताव...
शैलजासोबत अॅडमिट झाल्यानंतर त्याने शैलजाला डिस्चार्ज मिळताच स्वतःची रुग्णालयातून सुटी करून घेतली. यानंतरही तो आपल्या मुलाच्या उपचारासाठी त्या रुग्णालयात थांबला. 23 जून रोजी (ज्या दिवशी खून झाला) निखिल रुग्णालयात होता. त्या ठिकाणी शैलजा फिजिओथेरेपीसाठी आली होती. रुग्णालयातून शैलजा आणि निखिल एकाच होंडा सिटी कारमधून बाहेर पडले. वाटेत असताना निखिलने पुन्हा तोच लग्नाचा प्रस्ताव मांडला.


पुन्हा नकार, मग खून...
शैलजा आपल्या उत्तरावर ठाम होती. तिने पुन्हा निखिलचा प्रस्ताव फेटाळला. यावर निखिल इतका भडकला, की त्याने वेळीच आपल्या कारमध्ये ठेवलेला चाकू उचलला आणि तिच्यावर सपा-सप वार केले. गळ्यावर चाकूचे वार लागल्याने शैलजा गंभीर जखमी झाली. यानंतर निखिलने तिला कारमधून तशाच अवस्थेत बाहेर फेकले आणि पुन्हा-पुन्हा तिच्यावरून गाडी नेली. यामुळे शैलजाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली तेव्हा मेजर अमितने सुद्धा पहिला संशय निखिलवर व्यक्त केला. त्यावेळी निखिलचा फोन स्विच ऑफ होता. त्याच्या घराला सुद्धा कुलूप होते. यावरून पोलिसांचा संशय बळावला.

 

कारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिलने आपल्या कारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, याच कारमधून त्यांना काही पुरावे सापडले आहेत. ज्यावेळी त्याने शैलजाला चाकूने भोसकले, तेव्हा सारे रक्त कारवर पडले होते. आरोपी कार घेऊन मेरठला पोहोचला होता. त्यावेळी एका ठिकाणी थांबून त्याने कारवर पडलेला रक्त टॉव्हेलने साफ करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना तो टॉव्हेल सुद्धा सापडला आहे. 


असे पकडले...
हत्येनंतर निखिल दिल्लीतील साकेत येथील आपल्या घरी पोहोचला. काही वेळ परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याने पुन्हा लष्करी रुग्णालयात परतण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाच्या दिशेने निघाला परंतु, तो तेथेच चकरा लावत होता. यानंतर तो मेरठसाठी रवाना झाला. मेरठमध्ये त्याने तीन वर्षे काम केले होते. दिल्ली-मेरठ हायवेवर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना त्याची कार दिसून आली. यानंतर पोलिसांचे एक पथक निखिलचा पाठलाग करण्यासाठी निघाले. पोलिसांच्या याच पथकाने 24 जून रोजी दुपारी निखिलला अटक केली. यानंतर त्याला चौकशीसाठी दिल्लीत घेऊन आले. कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनेचा खुलासा केला. तीच माहिती पोलिसांनी माध्यमांसमोर मांडली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...