आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पतीला बटाट्यासाठी माती खोदताना सापडली कवटी, पत्नी म्हणाली भिऊ नकोस, हा माझा पहिला नवरा! Man Found Skull Whill Planitng Potatoes In Garden, Wife Says Don\'t Worry Its My First Husband.

पतीला बटाट्यासाठी माती खोदताना सापडली कवटी, पत्नी म्हणाली- भिऊ नकोस, हा माझा पहिला नवरा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> सैबेरियात 60 वर्षीय महिलेने कबूल केला हत्येचा गुन्हा
> 1997 मध्ये पहिल्या पतीचे तुकडे करून गार्डनमध्ये केले दफन
> दुसऱ्या पतीच्या हाती लागली कवटी, पाठवले तुरुंगात

 

सैबेरिया - सैबेरियामध्ये एका हत्येचे हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. येथील लूजिनो परिसरात एक व्यक्ती घराच्या गार्डनमध्ये बटाट्याची लागवड करत होता. अचानक माती खोदताना त्याच्या हाताला एक कवटी लागली. ती पाहताच त्याला धक्का बसला, परंतु हद्द तर तेव्हा झाली जेव्हा पाठीमागून त्याची पत्नी म्हणाली की, "भिऊ नकोस, हा माझा पहिला पती आहे, जो 20 वर्षांपूर्वी माझ्या हातून ठार झाला होता." 

 

दुसऱ्या पतीने पाठवले तुरुंगात...
- हे पूर्ण प्रकरण माहिती झाल्यावर दुसरा पती हादरला. पत्नी त्याला म्हणाली - 'ही 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा पहिला नवरा खूप दारू पिऊन घरी आला होता, रागातच मी त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केला. यामुळेच त्याचा मृत्यू झाला.' यानंतर 60 वर्षीय महिला तिच्या दुसऱ्या पतीला शांत होण्यासाठी सांगते, म्हणते की- 'आता सर्व विसरून जा.'

- परंतु दुसरा नवरा थेट पोलिसांना याची माहिती देतो. पोलिस म्हणाले- महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांना येथे पूर्ण सापळा तुकड्यातुकड्यांत आढळला. पोलिस म्हणाले- महिलेने 52 वर्षांच्या पहिल्या पतीची हत्या करून तुकडे तुकडे करून गार्डनमध्येच दफन केले होते. आणि त्यावर ती बटाट्याचे पीक घेऊ लागली होती. शेजारीपाजारी तिला विचारायचे की, तुझा नवरा गेला कुठे? तेव्हा ती सांगायची- एका कामासाठी ते बाहेर गेलेत, पण परत आलेच नाहीत.

 

पोलिस म्हणाले- बटाटे लावल्यामुळे वाचला दुसरा पती
- एक पोलिस ऑफिसर म्हणाले की, महिलेचा हा गुन्हा खूप गंभीर आहे आणि आता तिला 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी Photos व Video...  

 

बातम्या आणखी आहेत...