आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 महिन्याच्या चिमुकलीला वडिलांनीच दिला हाताने मृत्यू, तिची फक्त एवढीच होती चूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलरामपूर - एकीकडे सरकार 'बेटी बचाओ - बेटी पढ़ाओ'चा नारा देत आहे, तिथेच दुसरीकडे आजही मुलगा असावा या इच्छेपायी मुलींचा बळी दिला जात आहे. अशीच ताजी घटना यूपीच्या बलरामपूर जिल्ह्यातील तुलसीपूर परिसरातून समोर आली आहे. येथे एका महिन्याच्या मुलीला तिच्याच वडिलांनी क्रूर मृत्यू दिला. आपल्या फुलासारख्या मुलीच्या मृतदेहासमोर बसून जन्मदात्री आई न्यायासाठी आक्रोश करत आहे.

 

लग्नाच्या 4 वर्षांनी झाली पहिली मुलगी
- बलरामपूर जिल्ह्यातील तुलसीपूर परिसरातील रहिवासी राजेश चौहान यांनी 2014 मध्ये संगीताशी लग्न केले होते. शेजारी म्हणाले, लग्नानंतर दोघांमध्ये संबंध ठीक नव्हते.
संगीता म्हणाली,  "लग्नानंतरच राजेश अन् त्याच्या आईवडिलांनी मुलासाठी हट्ट धरला होता. 4 वर्षांनंतर जानेवारी 2018 मध्ये मी मुलीला जन्म दिला. मुलीचे तोंड पाहताच पती आणि सासू-सासरे खूप चिडले होते. ते नेहमी तिला टाकून देण्याची-फेकून देण्याची भाषा करत होत, पण मी ऐकायला तयार नव्हते." 
- "मला वाटले की आमची पहिली संतान आहे. तिच्या निरागस चेहऱ्याला पाहून सर्वांचा हृदयाला पाझर फुटेल. पण त्यांच्या मनात वेगळाच कट शिजत होता."

 

एवढाच होता दोष- मुलगा नाही मुलगी होती परी...  बापाने स्वत:च्या हातांनी दिला मृत्यू
- संगीता म्हणाली, "मी पहाटे 5 वाजता किचनच्या कामासाठी गेले होते. मी माझ्या तान्हुलीला सासूबाईकडे सोपवून गेले होते. घरी परतले तेव्हा माझ्या बाळाचे तोंड रक्ताने माखले होते. तिला पाहताच मी जोरात ओरडले. या तिघांनी मिळून माझ्या मुलीला कायमचे संपवले. तिचा एवढाच दोष होता की, मुलगी होती, मुलगा नव्हती."
- "पती राजेशने जिवे मारण्याची धमकी देत म्हटले की, हे इथंच संपवून टाक. कुणाला सांगशील तर तुलाही जिवंत ठेवणार नाही."
- संगीताने विरोध केल्यावर सासू-सासऱ्यासोबत मिळून पतीने तिला बेदम मारहाण केली. पीडित संगीता कशीबशी त्यांना हिसका देऊन तिथून पळून गेली. नातेवाइकांच्या मदतीने तिने बलरामपूरच्या एसपींना लेखी प्रार्थना पत्र देऊन आरोपी सासू-सासरे व पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपी फरार असून तिघांविरुद्ध कडक कारवाईची मागणी तिने केली आहे.
- या पूर्ण घटनाक्रमावर पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार म्हणाले- "ही खूपच गंभीर घटना आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल." 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज व व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...