आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • पत्नीवर भरदिवसा कोर्ट परिसरात तलवारीने हल्ला Man Kills Wife With Sword Inside Odisha Family Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीवर भरदिवसा कोर्ट परिसरात तलवारीने हल्ला, लपून बसली तरीही खेचून मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेशने पत्नीवर कोर्ट परिसरातच तलवारीने वार केले. - Divya Marathi
नरेशने पत्नीवर कोर्ट परिसरातच तलवारीने वार केले.

नॅशनल डेस्क - ओडिशाच्या संबलपूरमध्ये एका व्यक्तीने कोर्टाच्या वेटिंग रूममध्ये आपल्या पत्नीवर तलवारी हल्ला करून तिची हत्या केली. पत्नी तिच्या आईवडिलांसह कौटुंबिक न्यायालयात पतीशी प्रकरण मिटवण्यासाठी आली होती. परंतु काही वेळानेच पती तलवार घेऊन परतला आणि तिच्यावर हल्ला चढवला. आरोपीने सासू आणि पुतणीलाही जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

दोघांनी केले होते लव्ह मॅरेज
मृत संजिता आणि आरोपी रमेश दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. परंतु 5 महिने एकत्र राहिल्यानंतर दोघांत भांडणे होऊ लागली. यानंतर संजिता आपल्या आईवडिलांच्या घरी परत आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजिता खूप दिवस एकटी राहिली, तेव्हा आईवडिलांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले. ही बाब तिचा पती रमेशला कळली. यानंतर रमेशने पत्नीला परत मिळवण्यासाठी फॅमिली कोर्टात याचिका टाकली. संजिता आईवडिलांसोबत कौटुंबिक न्यायालयात पोहोचली. ती वेटिंग रूममध्ये रमेशची वाट पाहत होती. यादरम्यान रमेश पोहोचला आणि अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला चढवला.

-कोर्टात उपस्थित लोक म्हणाले की, संजिताने स्वत:ला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ती कोर्टाच्या इमारतीमागे लपून बसली. परंतु रमेशने तिचा पाठलाग सोडला नाही. त्याने संजिताला तेथून बाहेर खेचून काढले आणि तलवारीने सपासप वार केले.
- यानंतर रमेशने आपल्या सासऱ्यावरही हल्ला केला, परंतु ते वाचले. एवढ्यात गर्दीने रमेशला पकडले आणि मारहाण करायला सुरुवात केली. मग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो व व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...