आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dancing Uncle नंतर 'चायवाली आंटी' बनली इंटरनेट सेंसेशन, पाहा काय म्हणते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संपूर्ण देशाला आपल्या डान्सच्या वेगळ्या स्टाइलने भुरळ घालणारे विदिशा (मप्र) च्या डब्बू अंकलनंतर आथा सोमवती महावर नावाची एक महिला इंटरनेट सेंसेशन बनत आहे. त्यांची चहा पिण्याची आणि विचारण्याची पद्धत लोकांना प्रचंड भावल्याचे दिसत आहे. यू ट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर लोक सध्या त्यांना ट्रोलही करत आहे. डब्बू अंकलचा व्हिडिओ शेअर झाल्याने ते एका रात्रीत प्रसिद्ध झाले. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या एका ट्वीटने सोमवती महावर एकचम चर्चेत आल्या. 


काय आहे ट्वीट..
- या 'चायवाली आंटी' कोण-कुठल्या याबाबत अद्यात इंटरनेटवर फार माहिती नाही. पण सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओज रोज व्हायरल होत आहेत. 
- 14-15 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये ही महिला रोज चहा पिताना एक डायलॉग म्हणते. 'हॅलो फ्रेंड्स! चाय पी लो'। तिचा हाच डायलॉग असलेला व्हिडिओ पोलिसांनी शेअर केला आणि त्यासोबत एक मॅसेज दिला. तो व्हायरल झाला आहे. 
- मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्वीटर हँडलद्वारे सोमवती महावर यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत सेफ्टी आणि  सिक्युरिटीसाठी एक मॅसेज गिला. त्यात लिहिले होते, हॅलो फ्रेंड्स, हेल्मेट पहन लो. मुंबई पोलिस वेगळ्या स्टाइलने ट्वीट करण्यासाठी ओळखले जातात. 


लोकांचा प्रंचंड प्रतिसाद.. 
एका यूझरने ट्वीटवर कमेंट करत लिहिले, मुंबई पोलिस तुमचा सेंस ऑफ ह्युमर अत्यंत चांगला आहे. तुम्ही गमतीशीर रित्या लोकांना चांगला मार्ग दाखवत आहात. मुंबई पोलिसांच्या या ट्वीटला 4 हजारांहून अधिक लाइक्स आणि 1700 पेक्षा अधिक रिट्वीट्स मिळाले आहेत. 

 

पुढे पाहा, व्हि़डिओ..

बातम्या आणखी आहेत...