आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या ट्रेनमध्ये तो महिलेच्या अंगाला खेटत होता, दुसऱ्याने बनवला VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत (उत्तरप्रदेश) -  दिल्ली-सहारनपूर रेल्वे मार्गावर जाणाऱ्या एका रेल्वेत छेडछाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक 60-70 वर्षाचा माणूस बाजूलाच बसलेल्या महिलेची छेड काढत होता. ती पदर टाकून बाजूलाच बसलेली असताना हा माणूस तिच्या अंगाला विविध ठिकाणी हात लावत होता. त्याच्याच समोर बसलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडिओवर लाखो संतप्त प्रतिक्रिया आल्या. तसेच हजारो लोकांनी शेअर करून त्या घटनेला लज्जास्पद म्हटले आहे. 

 

- रेल्वेत महिलांच्या सुरक्षेवर पोलखोल करणारा हा व्हिडिओ 9 मार्च रोजी बनवण्यात आला असा दावा केला जात आहे. तो व्हिडिओ शेअर करणाऱ्याने पोलिसांना ते पाहून कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. 
- दिल्ली ते बडौतला जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेत हा प्रकार घडला आहे. यात एका म्हातारी व्यक्ती सोबतच बसलेल्या महिला प्रवाश्याची छेड काढत आहे. तो त्या महिलेच्या अंगाला, छातीला आणि मांडीला हात लावत होता.
- सुरुवातीला तिला डुलकी लागलेली असल्याने हा प्रकार समजला नाही. पण, जेव्हा तिला आपली छेड होत असल्याची जाणीव झाली तेव्हा ती थेट त्या म्हाताऱ्याशी भिडली. 
- विशेष म्हणजे, महिलेची छेड काढणारा तो माणूस शरमेने मान खाली घालणे सोडून तिच्यावर चिडला आणि उलट तिलाच धमक्या द्यायला लागला. याच दरम्यान समोरील व्यक्तीने या प्रकरणाचा व्हिडिओ बनवला.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडिया सर्वांना संतप्त करून सोडणारा तो व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...