आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 40 लाख खर्चून थाटामाटात लावले मुलीचे लग्न, 22 महिन्यांनी माहेरी आला कन्येचा मृतदेह Mother Tortured To Death By Husband For Dowry Of Duster Car In UP

मुलीच्या लग्नात 40 लाख खर्च केले, कशाचीच कमी ठेवली नाही, तरीही सासरच्या मंडळींनी केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर - मुलीचे लग्न थाटामाटात लावणे हे प्रत्येक बापाचे स्वप्न असते. यूपीच्या शाहजहांपूरचे रहिवासी एका वडिलांनी आपली मुलगी मितालीचे लग्न बँक ऑफ बडोदाच्या स्थानिक ब्रँच मॅनेजर अभिषेक मिश्राशी जुळवले. मुलीच्या सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी 40 लाख रुपयेही खर्च केले, परंतु 22 महिन्यांनंतर त्यांच्या घरी मुलीचा मृतदेहच आला. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये समोर आलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली होती.

 

हुंड्यात दिली होती 15 लाखांची कार, केला होता 40 लाखांचा खर्च
- शाहजहांपूरचे रहिवासी पृथ्वीनाथ यांची कन्या मिताली (23) अभ्यासात हुशार होती. तिने मायक्रोबायोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले होते.
- 26 एप्रिल 2016 रोजी मितालीचे लग्न बँक मॅनेजर अभिषेकशी झाले. पृथ्वीनाथ म्हणाले, "मुलाकडच्यांनी कारची मागणी केली होती. मी माझ्या कुवतीनुसार त्यांना 15 लाख रुपयांची कार खरेदी केली होती. सोन्याचे दागिने आणि इतर इलेक्ट्रॉनिक गिफ्ट्स मिळून लग्नात तब्बल 40 लाख रुपये खर्च झाले होते. लग्नात कशाचीच कमतरता नव्हती, परंतु त्यांना आणखी हाव सुटली होती."
- "लग्नानंतर त्यांनी आम्हाला डस्टर कारची मागणी सुरू केली. यावरून ते माझ्या मुलीला मारहाण करायचे. मुलीने अनेकदा सांगितले की, तिला तेथे राहायचे नाही, परंतु आम्ही नाते टिकवणेच योग्य समजले. हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली."

 

गर्भारपणातही केला भयंकर छळ
- मितालीच्या डेडबॉडीजवळून एक चिठ्ठी आढळली होती, ज्यात तिने आपल्यावर झालेल्या छळाची डिटेल माहिती लिहिली होती.
- चिठ्ठीत मितालीने लिहिले, "लग्नाच्या 2 महिन्यांनीच या लोकांची वागणूक बदलली. माझा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागले. मी गर्भवती झाल्यावर तर यांनी माझे जेवणच बंद केले. त्यांनी माझी मेडिकल टेस्ट करून माझ्या पोटात मुलगी असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर माझ्या गर्भपाताचे प्रयत्न सुरू केले. सासूने मला पायऱ्यांवरून धक्काही दिला. 4 महिन्यांची गर्भार असताना मला धक्के मारून घराबाहेर काढले."

 

बॉडीवर होत्या दुखापतीच्या खुणा, पीएम रिपोर्टमध्ये आले धक्कादायक कारण
- मितालीच्या डेडबॉडीवर दुखापतीच्या अनेक खुणा होत्या. तिची कंबर मारहाणीमुळे लालेलाल झाली होती.
- तथापि, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण दुखापतींमुळे नाही, तर सामान्य असल्याचे सांगण्यात आले. रिपोर्टनुसार, मितालीला टीबी होता. यामुळे तिची फुप्फुसे निकामी झाली होती. 
- सीओ सिटी सुमित शुक्ला म्हणाले, "पीएम रिपोर्टमध्ये जखमा आढळल्या नाहीत. मुलीच्या माहेरच्यांनी केलेल्या हत्येच्या आरोपांचा कोणताही सबळ पुरावा मिळालेला नाही. यामुळे ही केस बंद करण्यात आलेली आहे."
- मितालीचे वडील म्हणाले, सासरच्यांनी ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलली. त्यांना आजही मुलीच्या न्यायाची प्रतीक्षा आहे. 


आजोळी राहते मितालीची मुलगी
- मिताली आपल्या मागे 7 महिन्यांची मुलगी सोडून गेली. ती आपल्या आजोळीच राहते. या लहान मुलीचे वडील तिला विचारतही नाहीत. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा धक्कादायक video व Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...