आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षीय चिमुरड्याने पाहिले होस्टेलच्या गार्डचे एका मुलीशी 'संबंध', बदनामीच्या भीतीने Murder

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत चिमुरड्याच्या आईने असा आकांत केला. - Divya Marathi
मृत चिमुरड्याच्या आईने असा आकांत केला.

पाटणा - राजधानीच्या शेफाली इंटरनॅशनल स्कूलच्या होस्टेलमध्ये 8 जुलै रोजी झालेल्या 6 वर्षीय अभिमन्यू या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी त्या अल्पवयीन विद्यार्थिनीलाही अटक केली आहे, जिने त्याची हत्या केली होती. हत्येच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 6 जुलै रोजी शाळेचा गार्ड पप्पू हा होस्टेलमध्ये गेला होता. मृत अभिमन्युने विद्यार्थिनीला गार्डसोबत बाथरूमध्ये जाताना व संबंध बनवताना पाहिले होते. 8 जुलैच्या रात्री 9 वाजता अभिमन्यूने विद्यार्थिनीचे पुस्तक फाडले आणि तिचे केस ओढले. तिनेही त्याला मारहाण केली. चिडलेल्या अभिमन्यूने तिला धमकी दिली की, तो गार्डसोबत केलेली गोष्ट सर्वांना सांगून टाकीन. यावर ती विद्यार्थिनी भ्यायली आणि कट रचून तिने अभिमन्यूचा मर्डर केला. आरोपी विद्यार्थिनी सारखी हेच म्हणत होती की, तिने त्याला एकटीनेच मारले आहे, परंतु पोलिस फरार झालेल्या गार्ड पप्पूचा शोध घेत आहेत. पोलिसांना संशय आहे की, हत्येमध्ये गार्डचाही हात असावा.

 

सकाळी उठून केली अंघोळ, चेहऱ्यावरूनच कळत होते ती तणावात आहे...
- ग्रामीण एसपी आनंद कुमार यांनी हत्याकांडाचा खुलासा करत गुरुवारी सांगितले, 8 जुलैच्या रात्री उशिरा चिमुरड्याची हत्या केल्यानंतर ती तणावात होती. 9 जुलैच्या सकाळी जेव्हा सर्व विद्यार्थिनी झोपेत होत्या तेव्हा पहाटेच उठून बाथरूममध्ये गेली आणि अंघोळ केली. तिने मर्डर करतानाचे कपडे बदलून दुसरे घातले.

- पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि विद्यार्थिनीची चौकशी केल्यावर ती भ्यायलेली आढळली. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की, तणावात आहे. पोलिसांनी सर्वात आधी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. मग होस्टेलच्या वॉर्डन, शिक्षकांसहित इतरांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली.

 

अशी केली हत्या...
चिमुरडा अभिमन्यू होस्टेलमध्ये आपल्या बहिणींसोबत झोपायचा. त्या रात्री आरोपी विद्यार्थिनीने अभिमन्यूच्या दोन्ही बहिणींना आपल्या बेडवर झोपवले. अभिमन्यू त्याच्या बेडवर एकटाच होता. सर्व झोपी गेल्यावर रात्री एक-दोन वाजता विद्यार्थिनी उठली आणि अभिमन्यूच्या बेडवर गेली. तो गाढ झोपेत होता. आधी तिने एका हाताने त्याचे तोंड दाबले, मग दुसऱ्या हाताने दोन्ही पाय धरले. त्याच्या छातीवर बसून तिने त्याचा गळा आवळला. अभिमन्यूने विरोध केल्यावर तिच्या गळ्याला नखांनी ओरबडल्याच्या खुणाही झाल्या. तिने अभिमन्यूचा गळा जवळजवळ 15 मिनिटे दाबून ठेवला. जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा ती आपल्या बेडवर येऊन झोपली.

 

एसआयटीने 4 विद्यार्थिनींना 20 तास चौकशी केली:

कुरकुरे आणि टॉफी खाऊ घालून पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीकडून जाणून घेतले सत्य
- आरोपीसहित 4 विद्यार्थिनी आणि इतरांनाही पोलिसांनी आळीपाळीने चौकशी केली. पोलिसांना संशय आला की, या विद्यार्थिनीला सर्व काही माहिती आहे. तिला विश्वासात घेऊन मग पोलिसांनी जवळजवळ 20 तास चौकशी केली.
- मुलींना खाण्यासाठी कुरकुरे आणि टॉफी देण्यात आली. एफएसएल टीम दोन दिवसांपासून शाळेतच होती. जेथे विद्यार्थिनीची चौकशी सुरू होती, तेथून काही अंतरावरच एका विद्यार्थिनीला मुद्दामहून ओरडायला लावले, जेणेकरून आरोपीला वाटावे की, पोलिस कुणाला तरी मारहाण करत आहेत. 

- मनोवैज्ञानिक दबाव बनवण्यासाठी एफएसएल पथकाने तिची नखे मॅग्निफाइंग ग्लासमधून पाहिली. म्हणाले- याच खुणा तर अभिमन्यूच्या गळ्यावरही होत्या. यामुळे आरोपी विद्यार्थिनी नर्व्हस झाली. मग मात्र तिने हत्याकांडाची सगळी हकिगत सांगून टाकली.

- विद्यार्थिनीने कबूल केले की, तिने अभिमन्यूची हत्या केली आहे. हत्येचा गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी एका 6 वर्षीय मुलाला त्याच बेडवर झोपवले. मग विद्यार्थिनीला सांगितले की, हत्या कशी केली ते सांग? विद्यार्थिनीने तोच सीन पुन्हा पोलिसांना करून दाखवला. पोलिसांची याची व्हिडिओ रेकॉर्डिंगही केली.

- विद्यार्थिनी म्हणाली, मी 15 मिनिटे त्याचा गळा दाबून ठेवला. यादरम्यान तिच्या गळ्यावर नखांनी ओरबाडल्याच्या खुणाही झाल्या. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ज्या बाबी समोर आल्या आहेत, त्यानुसार अभिमन्यूचा बराच वेळेपर्यंत गळा दाबण्यात आला. नखांच्या खुणाही आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विद्यार्थिनीचा जबाब जुळले आहेत.

 

हॉस्टेलमध्ये चालायच्या दारूच्या पार्ट्या, बाहेरून यायचे तरुण...
- ग्रामीण एसपी म्हणाले की, या शाळेत अवैध कामेही सुरू होती. मुलांच्या शिक्षणाबाबत तसेच शिस्तीबाबत शाळा प्रशासन गंभीर नव्हते. होस्टेलच्या ज्या रूममध्ये चिमुरड्याची हत्या झाली आहे, ती सील करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला शाळेविरुद्ध कारवाई करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

- पोलिसांना याबाबीची माहिती मिळाली आहे की, होस्टेलमध्ये दारूच्या पार्ट्याही चालत होत्या. काही मुले तेथे यायची.

 

बेडवर आढळलेले केस प्रयोगशाळेत पाठवणार
विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी केल्यावर पोलिसांना ही माहिती मिळेल की तिच्यावर दुष्कृत्य झाले आहे. दुसरीकडे, अभिमन्यूच्या बेडवर काही केस आढळले आहेत, जे विद्यार्थिनीचे आहेत. या केसांची हैदराबादेतील एफएसएलमध्ये तपासणी करण्यात येईल. घटनास्थळी आढळलेल्या विद्यार्थिनीव अभिमन्यूचे कपडे, बेडशीटला पाटणाच्या एफएसलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येईल.

 

फरार गार्ड आणि शाळा प्रशासनाशी संबंधित एका विद्यार्थ्याचा शोध सुरू
ग्रामीण एसपी आनंद कुमार म्हणाले, गार्ड पप्पू फरार आहे. त्याच्या अटकेनंतर आणखी खुलासे होऊ शकतात. याप्रकरणी स्कूल मॅनेजमेंटशी संबंधित एका मुलाची भूमिका संशयास्पद वाटते. 9 जुलैला गार्ड कामावर होता. लक्कीही पोलिस स्टेशनला गेला होता आणि मीडिया मॅनेज करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. परंतु यानंतर दोघेही फरार आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हृदयद्रावक घटनेचे आणखी काही Photos व Video...  

 

बातम्या आणखी आहेत...