आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भावजयीच्या प्रेमात दीर झाला बेभान: Murder Of Brother:Murder Of Brother For Illegal Relations With Bhabhi In Up Latest News And Updates

भावजयीच्या प्रेमात दिराने केली हद्द पार, भावजयी अन् प्रॉपर्टी दोन्हींसाठी केली भावाची हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी दिराचा भावजयी तसेच प्रॉपर्टीवर डोळा होता. यासाठी त्याने भावाची हत्या केली. - Divya Marathi
आरोपी दिराचा भावजयी तसेच प्रॉपर्टीवर डोळा होता. यासाठी त्याने भावाची हत्या केली.

> भावजयीशी लग्न करून प्रॉपर्टी हडपायची होती आरोपीला.

> खुनाचा आरोप लावला मृत भावाच्या मित्रावर.

 

शाहजहांपूर, यूपी - भावजयीवर एकतर्फी प्रेमात बेभान होऊन दिराने आपल्या चुलत भावावर गोळी झाडली. 12 जून रोजी घडलेल्या मर्डर मिस्ट्रीचा गुरुवारी पर्दाफाश झाला. आरोपीला भावाची हत्या केल्यानंतर भावजयीशी लग्न करून सगळी प्रॉपर्टी हडपायची होती.

 

भावजयी अन् प्रॉपर्टी दोन्हींवर दिराचा डोळा

- SP एस. चिनप्पा यांनी गुरुवारी या खळबळजनक मर्डर मिस्ट्रीचा खुलासा केला. SP म्हणाले की, ज्या दिवशी आरोपीने खून केला, त्या दिवशी भावजयीचा वाढदिवस होता.
- SP म्हणाले की, 12 जून रोजी पीयूष सक्सेना (32) याची त्याच्या राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. कुटुंबाने मृताच्या मित्रावर याचा आरोप केला होता. चौकशी समोर आले की, मृताचा चुलत भाऊ अर्पित हा त्याच्या भावजयीवर एकतर्फी प्रेम करत होता.

 

स्वत: खून करून दुसऱ्यावर लावले आरोप
- SP म्हणाले की, मृत आपल्या पत्नी आणि मुलाला मारहाण करायचा. अर्पितला हे सहन होत नव्हते. घटनेच्या 3 दिवस आधी मृत आपल्या पत्नीला तिच्या माहेरी बरेलीला सोडून आला होता. पीयूषला घरात एकटा पाहून आरोपी संध्याकाळी 7 वाजता लपून घरात घुसला. त्या वेळी पीयूष पूजा करत होता. अर्पितने संधी पाहून पीयूषच्या डोक्यात गोळी झाडली आणि तिथून पळून गेला. घरात शिरताना त्याला कुणीही पाहिले नव्हते म्हणून संशयाची सुई मृत पीयुषच्या मित्रावर गेली. तथापि, तपासानंतर त्याला सोडून देण्यात आले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या धक्कादायक घटनेचा Video आणि Photos...   

बातम्या आणखी आहेत...