आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅगमधून ठिपकत होते रक्ताचे थेंब, मग समोर आला मित्राचा खळबळजनक Murder

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> ग्रेटर नोएडातून कॅब बुक करून सुटकेसमध्ये मृतदेह कोंबून वृंदावनला पोहोचला होता आरोपी.

> मृत दीपांशूचा मामेभाऊच आहे आरोपींपैकी एक.

 

मथुरा, यूपी - ई-रिक्शामध्ये ठेवलेल्या सूटकेसमधून रक्ताचे थेंब ठिपकू लागल्यानंतर मर्डरचा खळबळजनक खुलासा झाला आहे. सूटकेसमध्ये एका तरुणाचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये कोंबण्यात आला होता. दोन तरुण वृंदावनातील रमणरेती परिसरात पोहोचताच बॅगमधून रक्त ठिपकू लागले. हे पाहून लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मित्राचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघेही आरोपी निघाले होते. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी याप्रकरणी तिसऱ्या आरोपीलाही अटक केली.

- सोमवारी वृंदावन पोलिसांनी सूटकेसमध्ये मृतदेह घेऊन फिरत असलेल्या गाजियाबादच्या विशाल त्यागी आणि कटनी(म.प्र.)चा रहिवासी पौरुख समाधिया यांना अटक केली होती. रमणरेती परिसरातील इस्कॉन मंदिराच्या जवळ ई-रिक्षामध्ये ठेवलेल्या सूटकेसमधून रक्त ठिपकू लागले होते. यावर लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिली.

 

रविवारी भांडणानंतर झाला होता मर्डर... 
आरोपी विशाल म्हणाला की, तो ग्रेटर नोएडाच्या गौर सिटीत एका फ्लॅटमध्ये राहून शिक्षण घेतात. रविवारी रात्री त्याचा मामेभाऊ दीपांशु (मृतक) मद्यप्राशन करून आला आणि तोडफोड करू लागला. दीपांशूला जेव्हा रोखले तेव्हा तो चाकू घेऊन त्याच्यामागे पळाला. पौरुखने मध्येच बचाव करत त्याला पकडले. यादरम्यान बाचाबाचीत चाकू दीपांशुला लागला आणि त्याचा मृत्यू झाला. आरोपी म्हणाला की, दीपांशुच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी ग्रेटर नोएडापासून ते वृंदावनपर्यंत कॅब बुक केली होती. यापूर्वी मृतदेहाचे दोन तुकडे करून तो सुटकेसमध्ये कोंबला होता.
- SP सिटी श्रवण कुमार सिंह म्हणाले की, मर्डरमध्ये मदत करणारा तिसरा मित्र मनोज ऊर्फ कुट्टूलाही सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. मनोज उत्तराखंडच्या रुद्रप्रयागातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्या जवळून मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू आणि टॉवेल जप्त केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos व Video...  

 

बातम्या आणखी आहेत...