आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Born Baby Found Inside Toilet Duct In Kerala पाइप उघडताच जे दिसले ते पाहून बसला धक्का

टॉयलेट जाम झाल्याने बोलावला प्लंबर, पाइप उघडताच जे दिसले ते पाहून बसला धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - केरळच्या पलक्कडमध्ये डॉक्टरांच्या घरातील टॉयलेटमध्ये 2 दिवसांच्या नवजात मुलीचा मृतदेह आढळला. वास्तविक, टॉयलेटमध्ये पाणी साचू लागले होते. ते ब्लॉक झाल्याने डॉक्टरांनी प्लंबरला बोलावले. मग सफाईदरम्यान कमोडच्या पाइपमध्ये नवजाताचे डोके दिसले. यानंतर लगेच पोलिसांना सूचना करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

 

कमोडच्या पाइपमध्ये फसला होता मृतदेह 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर अब्दुल रहमान आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी पेरिंथामन्ना आपल्या घरातच क्लिनिक चालवतात. क्लीनिकच्या साफ-सफाईदरम्यान घरातील मोलकरणीने क्लीनिकमधले टॉयलेट ब्लॉक झाल्याचे पाहिजे. त्यात पाणी साचले होते. मोलकरणीने ही बाब डॉक्टरांना सांगितली. यावर डॉक्टरांनी प्लंबरला बोलावले. प्लंबरने सफाई करणे सुरू केले तेव्हा कमोडमध्ये दोन दिवसांच्या नवजात मुलीचे अडकलेले डोके दिसले. यानंतर लगेच पोलिसांना सूचना देण्यात आली.

 

कमोडमध्ये कसा आला नवजाताचा मृतदेह?
पोलिसांच्या मते, मुलीचा मृतदेह 13 एप्रिल रोजी आढळला होता. प्राथमिक चौकशीवरून असे वाटत आहे की, क्लीनिकमध्ये आलेल्या एखाद्या महिलेने नवजात मुलीला टॉयलेटमध्ये फ्लश केले असेल. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस डॉक्टरांचीही चौकशी करत आहेत की, मागच्या काही दिवसांत त्यांच्या क्लिनिकमध्ये कोण-कोण आले होते आणि त्यापैकी किती जणांकडे प्रेग्नेंसी डेट होती. सध्या याप्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज व व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...