आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅगेत होता LIVE IN पार्टनरचा मृतदेह, दुर्गंधी आली तर म्हणाला, उंदीर मेला असेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद, युपी - येथील खोडा परिसरात खुनाचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांना कारमध्ये एका बॅगमध्ये मुलीचा मृतदेह भरलेला आढळून आला. मृतदेह 2-3 दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. दुर्गंधी पसरल्यानंतर हा प्रकार उघड झाला. तरुणीचा LIVE IN पार्टनर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला निघाला होता. पण शेजाऱ्यांचे लक्ष त्याच्यावर गेले. त्यामुळे आरोपी घटनास्थळाहून फरार झाला. मंगळवारी रात्रीची ही घटना आहे. पोलिसांनी बुधवारी घटनास्थळाची पुन्हा पाहणी केली. 

 

असा समोर आला प्रकार

-शिवम विधी आणि मृत ज्योती वर्मा नेहरू गार्डन परिसरातील वंदना एनक्लेव्हमध्ये भाड्याने राहायचे. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 
- 5-6 महिन्यांपासून ते याठिकाणी राहत होते. त्यांच्या घरातून दोन दिवसांपासूम प्रचंड दुर्गंधी येत होती. त्याबाबत मंगळवारी शेजारी शिवमला म्हणाले. त्यावर शिवमने उंदीर मेला असेल, घराची स्वच्छता करतो असे म्हणत त्याने टाळाटाळ केली. 
- त्यानंतर रात्री शिवमने एक सेल्फ ड्राइव्ह कॅब बूक केली. त्यात ज्योतीचा मृतदेह एका बॅगेत भरून मागच्या सीटवर ठेवला आणि तो फेकण्यासाठी निघाला. 
- पण वासामुळे लोक घराबाहेर आले आणि त्यांनी शिवमला अडवले. गर्दी पाहून शिवनने पळ ठोकला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. 
- पोलिसांना माहितीत समजले की, ज्योती(25) लुधियाना(पंजाब)ची राहणारी होती. तिच्या नातेवाईकांना पोलिसांनी माहिती दिली.  

 

बातम्या आणखी आहेत...