आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल चोरल्याच्या संशयातून 12 वर्षीय मुलाला पंख्याला उलटे लटकावले, बेदम मारहाणीचा Video Viral

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाजियाबाद - अशोक विहार कॉलनीत मोबाइल चोरीच्या आरोपावरून एका 12 वर्षीय बालकाला उलटे लटकावून बेदम मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. एसएसपींनी या प्रकरणाची दखल घेतल्यावर स्थानिक पोलिसांनी सोमवारी एक तरुणासह 3 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. एसएसपी वैभव कृष्ण म्हणाले की, मुलाला मारहाणीचा व्हिडिओ शनिवारचा आहे. पोलिसांनी ज्युवेनाइल जस्टिस अॅक्टसह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, डिस्ट्रिक्ट लेबर कमिश्नर सिद्धार्थ मोदीयानी म्हणाले की, या प्रकरणात मुलगा हा 12 वर्षांहून कमी वयाचा असल्याची माहिती मिळाली आहे. पूर्ण तपासाअंती फॅक्टरी मालकाविरुद्धही कारवाई केली जाईल.

 

रोजंदारी मजूर म्हणून ठेवण्यात आले होते पीडित मुलाला
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक विहार कॉलनीत रहीसू नावाच्या व्यक्तीची फोमच्या गाद्या बनवण्याची फॅक्टरी आहे. फॅक्टरीत फोम कापण्यासाठी परिसरातीलच मुलांना रोजंदारी मजुरीवर ठेवले जाते. शनिवारी 4 ते 5 मुलांना रोजंदारीवर ठेवण्यात आले होते. त्या दिवशी फॅक्टरीतच काम करणाऱ्या एका कारागिराचा मोबाइल फोन अचानक हरवला. यावरून त्याने फॅक्टरीतच काम करणाऱ्या काही मुलांवर संशय व्यक्त करत त्यांना मारहाण केली. थोडीशी मारहाण करून त्याने त्या मुलांना सोडून दिले, परंतु अशोक विहारमध्ये राहणाऱ्या 12 वर्षीय मुलाला त्याने सोडले नाही. त्याने इतर साथीदारांसह मिळून मुलाला पंख्याला उलटे लटकावले अन् त्याला बेदम मारहाण केली. यादरम्यान एकाने या पूर्ण घटनेचा व्हिडिओही शूट केला. जो सध्या व्हायरल झाला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, Viral Video व संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...