आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबरेली - यूपीच्या बरेलीमध्ये एका कलियुगी मुलाने आपल्याच वयोवृद्ध आईला बेदम मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तो आपल्या वृद्ध आईला एवढी बेदम मारहाण करताना दिसतोय की, व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. कधी पोटावर लाथ मारतोय, तर कधी तोंडावर ठोसा मारतोय. यानंतर तो तिला फरपटत आपल्यासोबत घेऊन जातो. दुसरीकडे, वाटेने अनेक लोक जाताहेत, परंतु कुणीही त्या वृद्ध आईला वाचवण्याची माणुसकी दाखवली नाही. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना बरेलीच्या सुभाषनगर परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
असे आहे पूर्ण प्रकरण...
-सूत्रांनुसार, ही घटना सुभाषनगर परिसरातील खालसा इंटर कॉलेजजवळची आहे. पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
-सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी चौकशी करून आरोपी योगेंद्रला अटक केली. आरोपी योगेंद्रला दारूचे व्यसन आहे आणि दारूच्या नशेतच त्याने आपल्या आईला बेदम मारहाण केली.
आरोपी मुलाने गुन्हा कबूल करत हे म्हटले...
-पोलिस चौकशीत आरोपी योगेंद्रने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले, तो नशेत होता म्हणूनच आपल्या आईला मारण्याचे कृत्य त्याच्याकडून घडले. तो म्हणाला, आई मागच्या 3-4 दिवसांपासून घरातून गायब होती, जेव्हा सापडली तेव्हा घरी परत यायला नकार देत होती. म्हणूनच मला खूप राग आला.
काय म्हणतात पोलिस अधिकारी?
-या संबंधांत बरेलीचे एसपी (सिटी) रोहित सिंह म्हणाले, मीडियाच्या माध्यमातून एका व्हिडिओत महिलेला बेदम मारहाण होत असल्याचे प्रकरण समोर आले होते. या व्हायरल व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी वृद्ध महिलेचा मुलगाच आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या विदारक घटनेचे फोटोज व शेवटी व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.