आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक व्हिडिओ..! चोरी करण्यासाठी आलेला चोर रात्रभर छतावर उलटा लटकला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- जबलपूरमध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून कोणालाही धक्का बसल्याशीवाय राहणार नाही. येथे एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानात तर घुसला, परंतु तो बाहेर निघू शकला नाही. चोराने येथील एका दुकानाचे छत कापले आणि नंतर मध्ये उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मध्येच अडकला आणि रात्रभर तसाच छताला अडकून उलटा लटकून राहिला. सकाळी जेव्हा दुकान दाराने दुकान उघडले तेव्हा चोर खाली उतरू शकला. सदर घटना ही जबलपूर येथील असल्याची सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

 

असे आहे संपूर्ण प्रकरण...
- मिळालेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारीला रात्री जबलपूरच्या गल्लामंडी येथील एका धान्याच्या दुकानात चोराने चोरीच्या उद्देशाना घुसण्याचा प्रयत्न केला. चोराने दुकानात घुसण्यासाठी दुकानाचे छत कापले.
- चोर छत कापून उतरू लागला, परंतु, तो खाली पोहोचू शकला नाही. मध्येच तो एका लोखंडी रॉडला लटकला होता. छतात अडकलेल्या चोराने रात्रभर सुटका करण्याची वाट पाहिली, पंरतु तो अडकला असल्यामुळे सुटू शकला नाही.
- सकाळी जेव्हा दुकानाच्या मालकाने दरवाचा उघडला तेव्हा चोर छतामध्ये उलटा लटकलेला दिसला. त्याने पोलिसांना याची माहिती दिली. तसेच आसपासच्या लोकांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चोराला खाली उतरवेल आणि पोलिस ठाण्यात गेऊन गेले.


पुढील स्लाइडवर पाहा घटनेचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...