आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • लज्जास्पद: Police Was Making Video Of Injured Teacher In The Accident

'मला वाचवाss' म्हणून जखमी तडफडत होता, पोलिस मदतीऐवजी Video शूट करत राहिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बरेली, यूपी - उत्तर प्रदेशातून एक लज्जास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL झाला आहे. यात रस्ते अपघातात जखमी झालेला व्यक्ती तडफडत असताना पोलिसांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनवणी करत होता, परंतु ते मदतीऐवजी बेशरमपणाने व्हिडिओ शूट करत राहिले. खूप वेळानंतर जखमीला हॉस्पिटलला नेण्यात आले, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. 

 

SP म्हणाले, पोलिसांविरुद्ध होईल कारवाई... 

- अलीगंजचे रहिवासी इस्तखार अहमद हे मझगावच्या प्राथमिक शाळेत उर्दूचे सहायक शिक्षक होते. ते शाळेतून घरी परतत असताना बिसारतगंजच्या शिवनगर गावाजवळ त्यांच्या स्कूटीला JCB ने धडक मारली. यामुळे अहमद खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली. धडक मारल्यानंतर JCB चा ड्रायव्हर तिथून पळून गेला.

- जखमीला पाहून लोकांची गर्दी जमा झाली, परंतु मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. यादरम्यान तिथून काही पोलिस जात होते. जखमीने त्यांनाही मदत मागितली, परंतु पोलिस व्हिडिओ बनवत त्याची उलटतपासणी करत होते. कोणीही वेळेवर त्यांना हॉस्पिटलला नेले नाही.
- ही घटना 2 दिवसांपूर्वीची आहे, परंतु याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, पोलिस डिपार्टमेंटचा बेजबाबदारपणा आणि अमानवीय वर्तन पाहून दोषी पोलिसांविरुद्ध कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.
- तेथून जात असलेल्या इस्तखार यांच्या एका परिचित महिलेने त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. त्याही लोकांना लवकरात लवकर हॉस्पिटलला नेण्याची विनवणी करत राहिल्या.
- तब्बल तासाभराने घटनास्थळी अॅम्ब्युलेन्स दाखल झाली. जखमीला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा जीव मात्र वाचू शकला नाही.
- व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर SP ग्रामीण डॉ. सतीश कुमार यांनी अमानवीय वर्तन करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या धक्कादायक घटनेचा Viral Video... 

बातम्या आणखी आहेत...