आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी अशी दिली थर्ड डिग्री ट्रिटमेंट, पीडित तरुणीसमोर रडत राहिला 'रेपिस्ट'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मऊ - पोलिसांनी बलात्काराच्या आरोपीला केलेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घोसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका रेपच्या आरोपी तरुणाला फौजदार राजन कुमार यांनी फक्त संशयाचे आधारे बेल्टने बेदम मारहाण केली आणि आरोपीने गुन्हा कबूल केला. एवढेच नाही, यानंतर त्या तरुणाकडून पैसे घेऊन त्याला सोडून देण्यात आले. आता पीडित तरुणीचे कुटुंब न्यायासाठी दारोदार भटकत आहे. 

 

13 दिवस बांधून ठेवून केला रेप...
- शनिवारी घोसी येथील भैरोपूर गावातील रहिवासी तरुणीने गावातीलच अजित यादव नावाच्या तरुणावर बंधक बनवून रेपचा आरोप लावला. पीडितेचा दावा आहे की, आरोपी तरुण तिच्याशी लग्नासाठी दबाव बनवत होता. जेव्हा ती ऐकली नाही तेव्हा शाळेतून परतताना तिला बंधक बनवून एका सुनसान जागी नेण्यात आले. तेथे त्यांनी तरुणीवर लगातार 13 दिवस रेप केला. 14व्या दिवशी त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले.
- तरुणीने कुटुंबीयांसोबत मिळून आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली.

 

मग पोलिसांनी केली बेदम मारहाण
- आरोपाच्या आधारे पोलिसांनी अजीत यादवला अटक केली. आरोप कबूल करण्यासाठी फौजदार राजन कुमार यांनी बेल्टने तरुणाला मारहाण केली. मारहाणीच्या भीतीने अजितने आपला गुन्हा कबूल केला. व्हायरल व्हिडिओ फुटेजमध्ये आरोपी गुन्हा कबूल केल्याचे दिसून येत आहे. 
- तथापि, पीड़ित तरुणीच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी गुन्हा कबूल केल्यानंतर अजीत यादवकडून पैसे वसूल केले आणि त्याला सोडून दिले. पीडित तरुणी 11वीची विद्यार्थिनी आहे.
- पूर्ण प्रकरणात पोलिस अधीक्षकांनी मीडियाला काहीही सांगण्यात नकार दिला.

 

पुढच्या स्लाइड्वर पाहा, प्रकरणाचा व्हिडिओ व संबंधित फोटोज...

बातम्या आणखी आहेत...