आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन तरुणीवर गाइड अन् हॉटेल मॅनेजरसह 6 जणांनी केला रेप, विवस्त्रावस्थेत आढळली पीडिता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ चेन्नई - भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका रशियन तरुणीवर तामिळनाडूच्या तिरुअन्नामलाईमध्ये बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय पीडित तरुणी एकटीच भारतात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये तरुणीचा गाइड आणि होस्टेल मॅनेजरही सहभागी आहे. पीडिता मागच्या गुरुवारी पर्यटनस्थळ तिरुअन्नामलाईला पोहोचली होती.

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला तिच्या होस्टेलच्या रूममध्ये फरशीवर निर्वस्त्र अवस्थेत आढळली. त्या वेळी तिच्यावर चेहऱ्यावर आणि दंडावर दातांची चावल्याच्या खुणा होत्या. आरोपी म्हणतात की, त्यांनी तरुणीच्या सहमतीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. महिला तपास अधिकारी म्हणाल्या, तरुणीला ड्रग्ज ओवरडोस आणि किरकोळ दुखापती झाल्या असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेडिकल रिपोर्टमधून लैंगिक शोषण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...