आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shameful: चिमुरडा आईला सोडा-सोडा म्हणत होता, लोकांनी महिलेला झाडाला बांधून बेदम मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झुंझुनूं, राजस्थान - येथे महिलेला झाडून बांधून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका महिेलेला तिच्या लहान मुलासमोरच दिराच्या पूर्ण कुटुंबाने झाडाला बांधून बेदम मारहाण केली. चिमुरडा आईला वाचवण्याची धडपड करत होता. सूत्रांनुसार, दोन्ही कुटुंबात जमिनीवरून वाद सुरू होता. लाथाबुक्यांनी आणि काठीने महिलेला मारहाण करण्यात लहान मुलेही मागे नव्हती. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन एसपींना तपास अहवाल मागवला आहे.

ही लाजिरवाणी घटना नवलगडच्या बिलवा गावातील आहे. येथे राहणारी सुमन (34) हिचा मोठा दीर मणिरामशी जमिनीवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तिचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता. तेव्हा आरोपींनी महिलेला पकडले. तिला फरपटत नेऊन झाडाला बांधले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, महिलेला किती बेदम मारहाण झाली. मणिरामने त्याच्या मुलांनाही महिलेला मारायला लावले.
- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी ही घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या हृदयद्रावक घटनेचा video व Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...