आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला खांबाला बांधून गार्डने केली बेदम मारहाण, फक्त एवढेच होते कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद, यूपी - हा व्हिडिओ माणुसकीला काळिमा फासणारा आहे. गाझियाबाद विकास प्राधिकरण(जीडीए)चा हा व्हिडिओ आहे. येथील गार्ड मुलाला खंब्याला बांधून बेदम मारहाण करत आहे. मुलावर चहाचे पातेले चोरल्याचा आरोप आहे. मुलगा विनवणी करून सुटण्यासाठी धडपड करतो, परंतु गार्ड त्याला काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

-गाझियाबाद विकास प्राधिकरणात काही गार्ड कंत्राटी म्हणून ठेवण्यात आलेले आहेत. मागच्या आठवड्यात कार्यालयातून चहाचे पातेले गायब झाले. आणि या चोरीचा आरोप एका बालकावर लागला. 
-यामुळे गार्ड राकेश बाबू याने मुलाला खंब्याला बांधून काठने बेदम मारहाण केली आणि गुन्हा कबूल करायला लावला.
- यानंतर मुलाला जीडीएमध्ये तैनात इन्स्पेक्टरकडे सुपूर्द करण्यात आले. इन्स्पेक्टरनेही मुलाला कित्येक तास बसवून ठेवले. नंतर मुलाच्या आईने इन्स्पेक्टरचे पाय धरून विनवणी करून त्याची सुटका करून घेतली.
- या घटनेचा व्हिडिओ आता सोशल साइट्सवर व्हायरल झाला असून नेटकरी प्रचंड टीका करत आहेत.
- व्हिडिओ समोर आल्यानंतर गाझियाबादचे व्ही.सी. रितु माहेश्वरी यांनी गार्डला निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

 
पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हायरल व्हिडिओ...