आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकिंग CCTV फुटेज: दुकानाच्या शटरला टच करताच बसला जोरदार शॉक, क्षणातच झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना, पंजाब - भरपावसात एका दुकानाच्या शटरमध्ये उतरलेल्या करंटमुळे वाटसरूचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती रस्त्यातील पाण्यातून चालताना किनाऱ्याने जात होता. तेवढ्यात त्याच्या हाताचा शटरला स्पर्श झाला. या घटनेचे धक्कादायक CCTV फुटेज समोर आले आहे. अपघातावेळी शेजारचेच दुकान उघडे होते, त्यात एक महिला बसलेली होती.

- मूळ यूपीचा रवि कुमार येथे एका फॅक्ट्रीमध्ये जॉब करत होता. तो महुला फतेहनगरमध्ये किरायाने राहत होता. सोमवारी सकाळी 10 वाजता तो आपल्या घराकडे जात होता. तेव्हा तेथून एक कार गेली. कारला रस्ता देण्यासाठी तो रस्त्याच्या कडेला गेला. यादरम्यान त्याने बंद असलेल्या एका दुकानाच्या शटरला आधारासाठी हात लावला. परंतु टच होताच त्याला विजेचा जोरदार झटका बसला.
- रवि कुमार तिथेच कोसळला. त्याचा क्षणातच मृत्यू झाला. जवळच बसलेल्या महिला दुकानदाराने जेव्हा हे दृश्य पाहिले, तेव्हा तिला काय करावे हे समजलेच नव्हते.
- रवि कुमारला त्याचा भाऊ रुग्णालयात घेऊन गेला, परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
- मृताला 4 लहान मुली आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या शॉकिंग घटनेचे CCTV फुटेज...

 

बातम्या आणखी आहेत...