आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू - कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यात दीड वर्षाच्या एका चिमुकल्याने खेळता-खेळता प्रेशर कुकरची शिट्टी निगळली. यामुळे श्वासोच्छवास थांबून बाळ दगावले. ही घटना मांड्या जिल्ह्यातील नागराकेरे वस्तीत घडली. मृत भुवनचे आईवडील दोघेही जॉब करतात. यामुळेच भुवन आपल्या आजोबा-आजीच्या देखरेखीत राहतो. शनिवारी रात्री जेवण वाढताना आजीने कुकर जमिनीवरच ठेवले होते. बाळ रांगत-रांगत कुकरजवळ पोहोचले आणि कुकरच्या झाकणाची शिट्टी निगळली. बाळाच्या आजीने ताबडतोब शिट्टी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत शिट्टी त्याच्या श्वासनलिकेत अडकली होती. श्वास कोंडल्याने बाळाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुढच्या स्लाइडवर पाहा, या हृदयद्रावक घटनेचा Video व Photos...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.