आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • शॉकिंग सीसीटीव्ही फुटेज: पतीचे निधन झाल्याचे कळताच पत्नीने मारली इमारतीवरून उडी: Wife Committed Suicide After Death Of Husband

CCTV: पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच तिसऱ्या मजल्यावरून पत्नीने मारली उडी, एकत्रच निघाली दोघांची अंत्ययात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर (यूपी) - ऑपरेशननंतर पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीला धक्का सहन झाला नाही. तिने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यारून उडी मारून आत्महत्या केली. दोघांचाही मृत्यू 20 मिनिटांच्या अंतराने झाला. सोमवारी दोघांच्याही पार्थिवाची एकत्रच अंत्ययात्रा निघाली. हे दोघेही आपल्या मागे 2 लहान मुली सोडून गेले.

- SP वेस्ट संजीव सुमन म्हणाले की, प्लंबरचे काम करणारे सुरेश (45) कर्नलगंज परिसरात बेनाझाबर कॉलोनीमध्ये राहत होतो. त्यांच्या आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाले होते. 26 मे रोजी त्यांना वेदांता हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते.
- रविवार (23 जून) रोजी सुरेश यांचे ऑपरेशन करण्यात आले, परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. सुरेशला ICU मध्ये ठेवण्यात आले होते. त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला.
- सुरेश यांचे मेहुणे कौशल म्हणाले की, त्यांना भास झाला होता की, भावजीच्या मृत्यूची बातमी बहीण राणी (40) सहन करू शकणार नाही. 20 मिनिटांनी राणीला कुणीतरी ही दु:खद बातमी सांगितली. ती धक्का बसून बेशुद्ध झाली. तिला पाण्याचे शिंतोडे मारून शुद्धीवर आणण्यात आले. यानंतर ते सर्व हॉस्पिटलच्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी निघून गेले. कुणी जवळ नसताना राणीने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. CCTV मध्ये महिला खाली पडताना दिसत आहेत.
- कुटुंबात दोन लहान मुली शिवानी (10) आणि खुशबू (06) आहेत. कौशल म्हणाले, तिने आपल्या लहान मुलींचा एकदा तरी विचार करायचा होता.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आत्महत्येचे धक्कादायक CCTV Footage...   

 

बातम्या आणखी आहेत...