आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: डिलिव्हरीदरम्यान डॉक्टरकडून कटला बाळाचा गळा: Shocking Incident New Born Babys Throat Slit By Doctor During Operation In UP

Shocking: डिलिव्हरीदरम्यान डॉक्टरकडून कटला बाळाचा गळा, म्हणाला -'आईच्या जिवाला धोका होता'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑपरेशन करताना बाळाचा गळा कटला. - Divya Marathi
ऑपरेशन करताना बाळाचा गळा कटला.

सुल्तानपूर, यूपी - येथे ऑपरेशनदरम्यान नवजाताचा गळा कटल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. या घटनेमुळे संतप्त कुटुंबीयांनी डॉक्टरशी बाचाबाची केली. डॉक्टरचा तर्क आहे की, बाळ गर्भातच मृत झाले होते. जर ऑपरेशन करून त्याला बाहेर काढले नसते, तर आईच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. तथापि, जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत.

 

असे आहे प्रकरण 
- बालमपूरचे रहिवासी सुनील सोनी म्हणाले की, मंगळवारी प्रसूतिवेदना होत असल्याने पत्नी कुसुमला जिल्हा महिला रुग्णालयात अॅडमिट केले होते. येथे नॉर्मल डिलिव्हरीसाठी नर्स कुसुमला प्रसूती कक्षात घेऊन गेल्या. काही वेळानेच प्रकृती बिघडल्याचे सांगून कुसुमला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. ऑपरेशन डॉ. के.के. भट्ट यांनी केले.
- सुनील यांचा आरोप आहे की, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कुठल्यातरी अवजाराने बाळाचा गळा चिरला. डॉक्टरांनी आपली चूक लपवण्यासाठी बाळाचे ताबडतोब अंत्यसंस्कार करण्यासाठी सांगितले. परंतु कुटुंबीयांना झाला प्रकार कळून चुकला होता. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
- तथापि, डॉक्टर भट्ट म्हणाले की, त्यांनी नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले होते. बाळाचे पाय बाहेर आले होते, परंतु डोके आतच अडकले होते. दीर्घकाळ अडकून राहिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांशी सल्लामसलत करूनच ऑपरेशन केले होते. जर असे केले नसते, तर महिलेच्या जिवाला धोका झाला असता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... शेवटी पाहा या प्रकरणाचा Video... 

बातम्या आणखी आहेत...