आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आग्रा, यूपी - आग्राच्या भीमनगरीमध्ये सर्वात मोठ्या सामूहिक विवाह सोहळ्यात दोन समलैंगिक तरुणींनी लग्न केले. त्यात एका तरुणीने स्वत:ला मुलगा असल्याचे भासवले, तशी वेशभूषा केली. लग्नापर्यंत कुणालाच काहीही लक्षात आले नाही की, नवरदेव मुलगा नसून मुलगी आहे. यासाठी या दोघींनी खूपच सुनियोजित प्लॅन बनवला होता.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- एत्माउद्दौला परिसरातील रहिवासी BScची एक विद्यार्थिनी आणि BAची एक विद्यार्थिनी यांची वर्षभरापूर्वी कॉम्प्युटर क्लासदरम्यान मैत्री झाली. ही मैत्री नंतर समलैंगिक संबंधांमध्ये बदलली. दोन्ही तरुणींना आपसात लग्न करायचे होते, परंतु त्यांच्या कुटुंबीयांना भीती होती.
असा बनवला प्लॅन...
- एका तरुणीने स्वत:ला मुलासारखे प्रेझेंट केले आणि सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणीही केली.
- मुलगा बनलेल्या मुलीने नवरीच्या मुलीशी आपल्या नकली कुटुंबींयाची भेट घडवली. नवरीकडच्यांना अंदाजही आला नाही की, नवरदेव मुलगा नाही, तर प्रत्यक्षात मुलगी आहे.
- नवरीच्या कुटुंबीयांनी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुलीचे सर्व विधिपूर्वक लग्न लावले.
असे समोर आले सत्य...
जेव्हा सामूहिक विवाहाचे फोटो शेअर झाले, तेव्हा सत्य समोर आले. कुटुंबीयांनी समजूत घालूनही दोघी वेगळ्या होण्यासाठी तयार झाल्या नाहीत. मग हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले. पोलिस स्टेशनमध्ये नवरदेव (मुलगी) हिने स्वत:ला सज्ञान असल्याचे सांगून त्यांनी एकत्र राहण्यासाठी हा प्लॅन बनवल्याचे सांगितले.
पुढच्या स्लाइड्वर पाहा, आणखी फोटोज व शेवटी व्हिडिओ...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.