आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण Accident: धावत्या स्कूलबसचा पत्रा तुटला, सीटवर बसलेला विद्यार्थी रस्त्यावर पडून चाकाखाली चेंदामेंदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बसच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थी ठार झाला. - Divya Marathi
बसच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थी ठार झाला.

आग्रा -  आई-वडील आपल्या लाडक्या मुला-मुलीला स्कूलबसमध्ये बसवून निश्चिंत होऊन जातात. त्यांना खात्री असते की, आपला मुलगा सुरक्षित शाळेत पोहोचेल. परंतु तुमची चुकीची समजूत आहे. आग्रामध्ये स्कूलबसमध्ये बसलेल्या मुलासोबत जो अपघात झाला आहे, तो जाणून घेतल्यावर कोणत्याही आईवडिलांना धक्का बसेल. 

 

स्कूलबसचा पत्रा तुटला अन् चाकाखाली झाला चेंदामेंदा

शहरातील खेरागढ़मध्ये 12 वर्षीय एका विद्यार्थ्याचा स्कूलबसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. मुलगा बसमध्ये सीटवर बसलेला होता. बस धावत असताना अचानक सीटखालचा पत्रा तुटून पडला आणि विद्यार्थी रस्त्यावर पडला. क्षणार्धात बसच्या मागच्या चाकाखाली येऊन विद्यार्थ्याचा चेंदामेंदा झाला. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

6वीत शिकत होता मृत विद्यार्थी

- मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य (12) सरस्वती विद्या मंदिरात इयत्ता 6वीत शिकत होता. मंगळवारी दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर आदित्य स्कूलबसमधून इतर विद्यार्थ्यांसोबत घरी परतत होता. यादरम्यान हा दुर्दैवी अपघात झाला.

 

आईने केला आकांत

- आपल्या मुलाचा अपघाती मृत्यू पाहून त्याच्या आईने प्रचंड आक्रोश केला. ढसाढसा रडत तिने आकांत केला. या घटनेने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी व स्थानिक नागरिकांनी शाळेच्या संचालकांविरुद्ध निदर्शने केली. गोंधळ घालून व बसची तोडफोडही केली.
- कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळा संचालक, बस ड्रायव्हर व बसच्या मालकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी काही Photos व Video...  

बातम्या आणखी आहेत...