आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाय चारा खात होती, लालूपुत्राने विचारले- भाजपला हरवशील ना? मान हलवल्यावर लोक म्हणाले, 'हो' म्हणतेय!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- 'चाय पर चर्चा'ला उत्तर म्हणून 'सत्तू पार्टी तेजप्रताप के संग'
- तेजप्रतापने रस्त्यावर बसून खाल्ला सत्तू.

 

हाजीपूर (वैशाली) - राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव सोमवारी आपल्या विधानसभा मतदारसंघात दौऱ्यावर होते. त्यांनी येथील करहटिया गावात मशीनने कापून गायींना चारा खाऊ घातला. गायीलाच विचारले की, भाजपला हरवशील ना? गायने मान हलवल्यावर समर्थक म्हणाले, 'हो' म्हणतेय!'
तेजप्रतापने येथे नरेंद्र मोदींच्या 'चाय पर चर्चा'च्या अभियानाच्या धरतीवर 'सत्तू पार्टी तेजप्रताप के संग' कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत ते आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी कधी रिक्षात स्वारी केली, तर कधी स्वत:च रिक्षा चालवला. सायकलवरून एका गावातून दुसऱ्या गावात गेले. रस्त्यावर बसून कांदा-मिरची अन् सत्तू खाल्ले.

 

गरमी होऊ लागल्याने हापशावर केली अंघोळ: 
करहटिया गावात गरमीमुळे त्रस्त होऊन तेजप्रताप यांनी सर्वांसमोरच एका हापशाखाली अंघोळ केली. समर्थकांनी पाणी हापसून दिले. अंघोळीनंतर तेजप्रताप गमछा लपेटून उभे झाले. तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या मुलांनी त्यांना बॉडी दाखवण्यासाठी सांगितले. यावर मुलांना ते म्हणाले, "महुआ माझे घर आहे आणि इथं बॉडी नाही दाखवली जात."

 

लोजपा-रालोसपाचे महाआघाडीत स्वागत:

एक प्रश्नाच्या उत्तरात तेजप्रताप म्हणाले की, महाआघडीत सामील होण्याबाबत लोक जनशक्ति पार्टी (लोजपा) आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा) यांच्याशी कोणतीही बातचीत झालेली नाही. परंतु दोन्ही पक्षांची इच्छा असल्यास त्यांचे स्वागत आहे. ते म्हणाले की, केंद्रात महाआघाडीचेच सरकार येणार आहे. याचीच तयारी करावी.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित Video व Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...