आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यावर रक्तबंबाळ होते प्रेमीयुगुल, लोकांनी हसत-हसत बनवला VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटावा(यूपी) - येथे एका प्रियकराने आधी प्रेयसीवर गोळी झाडली आणि मग स्वत:वर बंदूक चालवली. रक्तबंबाळ अन् बेशुद्ध प्रियकराला आपल्या मांडीवर घेऊन प्रेयसी मदतीची विनवणी करत राहिली. तिथून येणारे-जाणारे मात्र फक्त तमाशा पाहत राहिले. त्यांनी हसत-हसत या घटनेचा व्हिडिओ बनवला.  रक्तबंबाळ प्रेयसी अर्धा तास लोकांना मदतीची याचना करत राहिली. याची माहिती मिळताच पोहोचलेल्या पोलिसांनी प्रेमीयुगुलाला रुग्णालयात पोहोचवले. उपचारादरम्यान प्रियकराचा मृत्यू झाला. दुसरीकडे प्रेयसीची तब्येत क्रिटिकल झालेली आहे. 

 

वर्षभरापासून सुरू होते अफेअर...
- घटना 19 फेब्रुवारीच्या भरथना कोतवाली परिसरातील वैवहा गावातील आहे. येथील रहिवासी प्रियकर शिवमचे शेजारच्या गावातील तरुणीशी अफेअर सुरू होते.
- 5 महिन्यांपूर्वी तरुणीच्या कुटुंबीयांना त्यांची प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यावर त्यांनी आक्षेप घेतला. कुटुंबीयांनी तरुणीवर दुसऱ्याशी लग्न करण्याचा दबाव बनवला. 
- तरुण शिवम हैदराबादेत सैन्यात तैनात होता. लग्न समारंभात सामील होण्यासाठी तो सुटी घेऊन गावी परतला होता.
- 20 फेब्रुवारीला त्याला परत ड्यूटी जॉइन करायची होती. यासाठी त्याने एका दिवसापूर्वी (19 फेब्रुवारीला) प्रेयसीला घराबाहेर भेटण्यासाठी बोलावले.
- दोघेही बाइकवरून निघाले आणि निर्मनुष्य रस्त्यावर पोहोचले. मृत प्रेयसीने लायसेन्सी रिव्हॉल्व्हरने आधी आपल्या प्रेयसीच्या डोक्यावर गोळी झाडली.
- यांनतर स्वत:लाही शूट केले. तेथून जाणाऱ्या वाटसरूंनी पोलिसांना याची माहिती दिली. यादरम्यान काहींनी या घटनेचा व्हिडिओही शूट केला. 
- पोहोचलेल्या पोलिसांनी रक्तबंबाळ प्रेमीयुगुलाला इटावा सरकारी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती जास्त गंभीर झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले.
- तिथे उपचारादरम्यान 21 फेब्रुवारी रोजी प्रियकर शिवमचा मृत्यू झाला, तर प्रेयसी तब्येत गंभीर झालेली आहे.

 

काय म्हणतात पोलिस?
- इटावा एसएसपी वैभव कृष्ण म्हणाले, ''जखमी तरुण आणि तरुणीला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी पोहोचले, परंतु तरुणाचा तोपर्यंत मृत्यू झाला. दुसरीकडे, तरुणीवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.''

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे फोटो व व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...