आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक Video: दारूच्या नशेत तर्रर होता बाप, 3 वर्षांच्या मुलाला जोरात आदळले रिक्षावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क -  दारूच्या नशेत हैदराबादेत एका व्यक्तीने पोटच्या 3 वर्षांच्या मुलाला ऑटो रिक्षावर आदळले. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अर्ध्या मिनिटाच्या या व्हिडिओत दिसतेय की, दारुडा आपल्या मुलाला उचलतो आणि जवळच उभ्या ऑटोच्या काचेवर त्याला जोरात आदळतो. बाळ जमिनीवर पडताच, तो पुन्हा त्याला उचलून आदळण्याचा प्रयत्न करतो. 

 

असे आहे प्रकरण
> पोलिस सूत्रांनुसार, शिवा गौड (40) असे आरोपीचे नाव आहे. तो रिक्षा चालवतो. आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी त्याला लवकरात लवकर जेरबंद करू असे सांगितले आहे. या घटनेनंतर 3 वर्षीय बालकाला गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

> पोलिस इन्स्पेक्टर पी. श्रीनिवास म्हणाले की, मुलाची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्याला चाइल्ड वेल्फेअर कमिटीकडे सोपवण्यात आले आहे. सोमवारी (9 जुलै 2018) आरोपी शिवा गोडचे त्याच्या पत्नीशी काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. यावरून चिडून त्याने स्वत:च्याच मुलासोबत असे कृत्य केले. तथापि, या भयंकर प्रकारानंतरही आरोपीच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली नाही. तथापि, पोलिसांनी स्वत:हून या प्रकाराची दखल घेत चाइल्ड केअर अँड प्रोटेक्शन अॅक्ट तसेच ज्युवेनाइल जस्टिस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हायरल झालेला हा भयंकर व्हिडिओ....  

बातम्या आणखी आहेत...