आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: 9 वर्षीय बालिकेवर 'रेप'चा प्रयत्न, आरोपीला पकडून लोकांनी केली अशी बेदम मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैनपुरी, यूपी - अवघ्या 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न करत असलेल्या एका नराधमाला लोकांनी पकडून बेदम मारहाण केली. यथेच्छ चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चिमुरडी खेळता-खेळता मॅरेज हॉलमध्ये गेली होती. आरोपी टेंट हाऊसमध्ये काम करतो. शनिवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल साइट्सवर व्हायरल झाला होता.

- घटना शनिवारी संध्याकाळी करहल रोडवर घडली. अॅडिशनल एस. पी. ओमप्रकाश सिंह म्हणाले की, अस्यौल गावातील रहिवासी राकेश कुमार टेंट लावण्याचे काम करतो. चिमुरडीचा आरोप आहे की, त्याने त्याच्यासोबत तिला एका रूममध्ये नेले. तेथे आरोपीने चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न केला. परंतु तेवढ्यात तिने जोरजोरात आरडाओरड केली. आवाज ऐकून चिमुरडीची आई आणि इतर काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली. 
- लोकांनी आरोपीला पकडल्यानंतर त्याचे कपडे उतरवले आणि बेदम मारहाण केली. यानंतर वस्तऱ्याने त्याचे अर्धे टक्कल करण्यात आले,  आणि मग पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Viral Video व Photos... 

बातम्या आणखी आहेत...