आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Viral Video: तरुणी भय्या भय्या म्हणत होती, पण नराधम कपडे फाडण्याचा प्रयत्न करत होते: Video Of Molestation In Bihar Viral On Social Media

धक्कादायक: तरुणी भय्या-भय्या म्हणत होती, पण नराधम कपडे फाडण्याचा प्रयत्न करत होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा, बिहार - बिहारमधून 2 आणखी धक्कादायक VIDEO समोर आले आहेत. गयाच्या वजीरगंज पोलिस स्टेशनमधील तरवां बाजारात एक वयस्कर व्यक्तीसह 4 जणांनी मित्रांसोबत फिरायला आलेल्या तरुणीची छेडछाड करून मारहाण केली. घटनेचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर सक्रिय झालेल्या पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. दुसऱ्या VIDEO मध्ये एका कपलला काही जणांनी पकडून ठेवले असून त्यांना बेदम मारहाण करत आहेत. ते मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्नही करत आहेत. 

ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे...

 

असे आहे प्रकरण...
- पहिला व्हिडिओ :
एका वयस्करासह 4 जण एक तरुणी आणि तिच्या मित्राला त्रास देताना दिसत आहेत. त्यांनी तरुणीला पकडून ठेवले आहे. तरुणी विनवणी करताना दिसत आहे, "भय्या, त्याला सोडून द्या. परंतु ते लोक सातत्याने मारहाण आणि छेडछाड केली आहे." 

- आरोपी तरुणीसोबत असलेल्या तिच्या मित्रालाही बेदम मारहाण करतात.

 

दुसरा Video - दुसऱ्या VIDEO मध्ये दिसत आहे की, एका कपलला पकडून काहीजण मारहाण करत आहेत. ते तरुणीचे कपडेही फाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

- गयाचे SSP राजीव मिश्रा म्हणाले की, वजीरगंज प्रकरणात VIRAL व्हिडिओच्या आधारावर पीड़िता आणि आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत तेथे फरायला वा भेटायला गेली होती. तेव्हा आरोपींनी त्यांना पकडले. याप्रकरणी आणखी 2 आरोपी फरार आहेत. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...