आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगजेबच्या हत्येपूर्वी दहशतवाद्यांनी तयार केला Video, एन्काऊंटरबाबत विचारले प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगजेब यांचे गुरुवारी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. गुरुवारी रात्री 8 वाजता पुलवामा जिल्ह्यात गोळ्या घालून चाळणी केलेला त्यांचा मृतदेह आढळला होता. 

 

श्रीनगर - दहशतवाद्यांनी आर्मी जवान औरंगजेबच्या हत्येपूर्वी त्याचा एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात दहशतवादी औरंगजेब यांना पोस्टींग, दहशतवाद्यांचे एन्काऊंटर आणि एका मेजरबाबत विचारणा करत असल्याचे दिसत आहे. औरंगजेब यांचे गुरुवारी ते ईदसाठी घरी निघाले असताना अपहरण करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह पुलवामामध्ये आढळला होता. 


गोळ्या मारण्यापूर्वी तयार केला दीड मिनिटांचा व्हिडिओ 
- व्हिडिओमध्ये औरंगजेब यांनी टी-शर्ट आणि जीन्स परिधान केल्याचे दिसत आहे. त्यांना झाडाला बांधण्यात आले असून दहशतवादी त्यांना वडिलांचे नाव आणि पोस्टींगबाबत विचारत असल्याचे दिसत आहे. ताल्हा राशीद, मोहम्मद आणि वसीमच्या एन्काऊंटरमध्ये समावेश होता का असेही त्यांना विचारण्यात आले होते. 
- ताल्हा, वसीम आणि मोहम्मद यांना 2017 मध्ये एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले होते. ताल्हा जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा पुतण्या होता. 


समीर टायगरला मारणाऱ्या मेजरबाबतही विचारले 
- दहशतवाद्यांनी औरंगजेबला मेजर रोहित शुक्लाबाबत विचारणा केली. मेजरच्या सुरक्षेत तू तैनात आहे का असेही त्यांनी विचारले. मेजर शुक्ला यांनी याचवर्षी एप्रिलमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर समीर टायगरला चकमकीत मारले होते. जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीचे जवान औरंगजेब तेव्हा शोपियाँच्या शादीमर्गमध्ये रोहित शुक्लाबरोबर तैनात होते. 
- समीर टायगरने व्हिडिओ पाठवून मेजर रोहित शुक्ला यांना धमकी दिली होती. त्यानंतर 18 तासांनीच 30 एप्रिलला मेजर शुक्ला यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने चकमकीत त्याला ठार केले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...