आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षांच्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला 5 चप्पलची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेने आरोपीला पाच चप्पल मारुन शिक्षा दिली. - Divya Marathi
महिलेने आरोपीला पाच चप्पल मारुन शिक्षा दिली.

मथुरा (उत्तर प्रदेश) - जिल्ह्यातील मांट पोलिस स्टेशन अंतर्गत एका पंचायतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशी माहिती आहे, की गाव पंचायतीने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला शिक्षा म्हणून पाच चप्पल मारण्याचे फर्मान सोडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली असून, त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. 

 

काय आहे प्रकरण 
- मांट पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात शुक्रवारी रात्री एक 60 वर्षांची महिला घराच्या अंगणात झोपलेली होती. 
- महिलेचा शेजारी दारुच्या नशेत तिच्या जवळ आला आणि त्याने वृद्ध महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. 
- महिलेने त्याला विरोध केला तेव्हा आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला. 
- या घटनेनंतर गाव पंचायतीने आरोपीला महिलेने पाच चप्पल मारण्याचे फर्मान देऊन प्रकरण मिटवले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. 

बातम्या आणखी आहेत...