आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • स्वत:च्या बापाला झाडाला बांधून मुलाने केली बेदम मारहाण, हे होते कारण.. Viral Video: Attacked By The Son On Mental Ill Father

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Viral Video: स्वत:च्या बापाला झाडाला बांधून मुलाने केली बेदम मारहाण, हे होते कारण..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर, यूपी - कुशीनगरच्या पडरौना परिसरातून क्रौर्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक मुलगा आपल्याच वडिलांना दोरीने झाडाला बांधून बेदम मारहाण करताना दिसत आहे. एवढेच नाही, वडिलांना वाचवायला गेलेल्या छोट्या भावालाही त्याने चपलेने मारहाण केली. वडिलांचा फक्त एवढाच दोष आहे की, ते गतिमंद आहेत.  

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
-कलियुगी मुलाने आपल्याच वडिलांचे हात-पाय बांधून जनावरांसारखी मारहाण केली. वडील दयेची भीक मागत होते, पण मुलगा फरपटत त्यांना मारतच राहिला. वडिलांच्या अंगावर कुठेही लाथा-बुक्क्या मारत राहिला. गल्लीतल्या लोकांनी डायल 100 वर माहिती दिली. पोलिस पोहोचले, परंतु काहीही कारवाई न करताच परतले.


असे आहे प्रकरण...
-पडरौनानगरच्या नौका टोलातील नुरूल इस्लाम ऊर्फ हत्थू हे मानसिकरीत्या ठीक नाहीत. त्यांचा मुलगा मोनू आणि रहीम त्यांना घराबाहेर काढून देऊ इच्छितात. परंतु नुरूल घर सोडायला तयार नाहीत.
- यामुळेच चिडून मोठा मुलगा मोनू त्यांना शिवीगाळ करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु नुरुल यांनी मुलावर वीट फेकली, तेव्हा तो चिडला.
-मुलाने नूरूल यांचे हात-पाय दोरीने झाडाला बांधले. मग बेदम मारहाण केली.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, व्हायरल झालेला व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...