आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल डेस्क - कठुआ गँगरेप. 8 वर्षीय बालिकेला किडनॅप करून रेप करण्यात आला आणि नंतर निर्घृण हत्या झाली. चार्जशीटमध्ये लिहिलेल्या बाबींवरून कळले की, चिमुरडीवर किती पाशवी अत्याचार झाले. यानंतर सोशल मीडियापासून ते रस्त्यापर्यंत लोकांनी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलने केली. यादरम्यान पीडितेच्या नावाने एक 55 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओसोबत लिहिण्यात आले आहे की, हा त्या मृत चिमुरडीचा शेवटचा व्हिडिओ आहे, जिची कठुआमध्ये हत्या झाली. परंतु व्हिडिओची हकिगत वेगळीच आहे. लोग जराही विचार न करता या व्हिडिओला फॉरवर्ड करत सुटले आहेत.
जुलै 2017 चा आहे हा व्हिडिओ...
व्हिडिओला यू-ट्यूब, ट्विटर आणि फेसबुकवर अनेक अकाउंट्समधून अपलोड केले जात आहे. परंतु, हा व्हिडिओ कठुआ गँगरेप पीडितेचा नाहीये. यापूर्वी जुलै 2017 मध्ये इम्रान प्रजापति नावाच्या व्यक्तीने हा अपलोड केला होता. ते एक कवी आहेत.
इम्रान प्रजापतींनी स्वत: सांगितले सत्य
कठुआ पीड़ितेच्या नावाने व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे खुद्द इम्रान प्रजापती यांनी फेसबुकवर पाहिले. ते म्हणाले की, "18 जुलै 2017 रोजी मी या छोट्या फॅनचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या वेळी माझ्या एका चाहत्याने तो मला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. तेव्हा काही हजार लोकांनी माझ्या पेजवरून ही नज्म शेअर केली होती. आज सोशल मीडियावर या मुलीला कठुआ पीडिता असल्याचे सांगून व्हायरल केले जात आहे, जे अत्यंत चुकीचे आहे. सोशल मीडियावर काहीही शेअर करण्याआधी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे."
- प्रजापतींनी पुढे लिहिले आहे की, त्यांनी ही कविता नजीब अहमद यांच्या आठवणीत लिहिली होती. ते JNU विद्यार्थी आहेत आणि 2016 पासून बेपत्ता आहेत.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज व शेवटी व्हिडिओ..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.