आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक गायब होऊ लागले होते महिलांचे अंडरगारमेंट्स, सोसायटीतल्या रहिवाशांनी तरुणाला रंगेहाथ पकडून दिला चोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत, गुजरात - शहरातील कतारगामच्या कुबेरनगर सोसायटीमध्ये मागच्या 15 दिवसांपासून महिलांच्या अंडरगारमेंट्स चोरी करत असलेल्या एका विकृत तरुणाला शेवटी मंगळवारी पकडण्यात यश आले. लोकांनी जेव्हा त्याला रंगेहाथ पकडले, तेव्हा पाया पडू लागला. यानंतर जमावाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. तथापि, त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. हा विकृत एक मानसिक रोगी असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

15 दिवसांपासून होत होती ब्रा अन् निकरची चोरी 
सूत्रांनुसार, सोसायटीतील महिला नेहमीप्रमाणे कपडे धुतल्यावर ते बाहेर वाळत घालत होत्या. दरम्यान, आरोपी तेथे येऊन त्यातील ब्रा आणि निकर खिशात टाकून निघून जायचा. एक-दोन महिलांच्या ही बाब लक्षात आली होती. तथापि, मंगळवारी या चोराला पुन्हा तसेच करताना पकडण्यात आले. लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली व नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. तो असे का करत होता हे सांगू शकला नाही. मात्र, पुन्हा तेथे येणार नाही, मला जाऊ द्या, असे म्हणत राहिला.

 

स्नोड्रॉपर नावाचा मानसिक आजार
अंडरगारमेंट चोराची ओळख पटली नाही, तो कुठे राहतो याचीही माहिती समोर आली नाही. तथापि, अशा प्रकारची चोरी करणाऱ्या व्यक्तीला स्नोडॉपर म्हणतात असे तज्ज्ञांनी सांगितले. हा एक मानिसक आजार असल्याचेही ते म्हणाले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी photos... 

 

बातम्या आणखी आहेत...