आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर नव्हे, हे तर \'नागलोक; बीन वाजवताच एकापाठोपाठ एक निघाले 18 King Cobra

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनौज - उत्तर प्रदेशातील कनौज येथे एका गावात राहणाऱ्या महिलेच्या घरात साप निघाले. घाबरत सुटलेल्या महिलेने घराबाहेर पडून लोकांना गोळा केले. घरात एक नव्हे, तर आणखी काही साप फिरत असल्याचे लोकांना कळाले. यानंतर गावकऱ्यांनी गारुडींच्या समूहाला बोलावले. त्यांनी बीन वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा गावकऱ्यांमध्ये आणखी भीती पसरली. बीन वाजताच एकानंतर एक या घरातून तब्बल 18 किंग कोब्रा बाहेर निघाले. यानंतरही गावकरी शांत झाले नाही. त्यांनी आणखी साप असतील या भितीने तिचे अख्खे घर खोदून काढले. त्यानंतरही लोकांना घरातून सापाची 50 अंडी सापडली आहेत. 


ही घटना तिर्वा तालुक्यातील डढियान गावात राहणाऱ्या मीरा देवी हिच्या घरात शनिवारी घडली. विधवा असलेली मीरा देवी आपल्या 2 मुलांसह गेल्या अनेक वर्षांपासून या झोपडीत राहत होती. आपले घर प्रत्यक्षात नागांचे घर असल्याची तिला देखील कल्पना नव्हती. तेही सामान्य सर्प नव्हे, जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक किंग कोब्राचा तो गढ होता. शनिवारी सकाळी ती जेव्हा झोपेतून उठली, तेव्हा अचानक तिला झोपडीत दोन साप दिसून आले. तिने पळत बाहेर जाऊन गावकऱ्यांना गोळा केले. गारुडींच्या समूहाने हे किंग कोब्रा असल्याचे सांगितले आहे. 


गरीबाचे घर उद्ध्वस्त, खजिन्याची चर्चा
गारुडींसह गावकऱ्यांनाही या घरात आणखी सर्प निघतील असा संशय आला. त्याच संशयात 18 साप निघाल्यानंतरही त्यांनी अख्खी झोपडी खोदून काढली. यात सापाची 50 अंडी सापडली आहेत. आता मीरा देवी आणि तिच्या दोन मुले आता बेघर झाले आहेत. काही गावकरी आता या झोपडीत खजिना असल्याच्या चर्चा करत आहेत. घरात सापडलेले नाग हे त्या खजिन्याचे सुरक्षा करत होते असेही गावकऱ्यांना वाटत आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...