आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पाहा आणीबाणीची पूर्ण कहाणी Why Did Indira Gandhi Declare Emergency In India

'राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लावली आहे...', जेव्हा आकाशवाणीवर आला होता इंदिरा गांधींचा आवाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - 'राष्ट्रपतीजींनी आणीबाणीची घोषणा केली आहे, परंतु यामुळे तुम्ही भयभीत होण्याची गरज नाही.', हे शब्द होते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे जे त्यांनी 26 जून 1975 रोजी सकाळी आकाशवाणीवर काढले होते. इंदिरांच्या या घोषणेच्या काही तासांपूर्वीच 25 आणि 26 जूनच्यादरम्यान रात्री आणीबाणीच्या आदेशावर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी स्वाक्षरी केली होती. त्यासोबतच ती देशभरात लागू झाली होती. आज आणीबाणी लागू करण्याच्या घोषणेला 43 वर्षे पूर्ण होत आहेत.

 

का लावण्यात आली होती आणीबाणी?
आणीबाणीचे मूळ 1971 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे, जेव्हा इंदिरा गांधींनी रायबरेली मतदारसंघातून राजनारायण यांचा पराभव केला होता. परंतु राजनारायण यांनी हार मानली नाही उलट निवडणुकीत गडबड केल्याचा आरोप करत हायकोर्टात आव्हान दिले. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टाचे जस्टिस जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करून त्यांना 6 वर्षे निवडणूक लढण्यावर प्रतिबंध लावला. कोर्टाच्या निकालानंतर इंदिरा गांधींवर विरोधकांनी राजीनाम्याचा दबाव टाकला. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.

जयप्रकाश नारायण यांनी इंदिरांविरुद्ध आघाडी उघडलेली होती. आणीबाणीच्या माध्यमातून इंदिरा गांधींनी तो विरोध शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु 19 महिन्यांनी 18 जानेवारी 1977 रोजी इंदिरांनी अचानकच मार्चमध्ये लोकसभा निवडणुका घेण्याची घोषणा केली. 16 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत इंदिरा आणि संजय दोघेही पराभूत झाले. 21 मार्च रोजी आणीबाणी संपली, परंतु आपल्या मागे लोकशाहीचा सर्वात मोठा धडा सोडून गेली.

 

व्हिडिओतून पाहा - आणीबाणीची पूर्ण कहाणी 

बातम्या आणखी आहेत...