आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • विदेशी गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले पतीला: Wife Caught Husband With Foreign Girlfriends

पत्नीने विदेशी girlfriend सोबत पकडले, तर म्हणाला- -\'आम्ही फक्त फ्रेंड, हवे तर मेडिकल चेकअप कर\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद, गुजरात - शहराच्या शिवरंजनी परिसरात एका महिलेने बिझनेसमन पतीला विदेशी तरुणीसोबत प्रणयक्रीडा करताना पकडले. तथापि, पतीने असे काही घडल्याचे नाकारले आहे. पत्नीचा आरोप आहे की पतीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलेली तरुणी थायलंडची आहे. पत्नीचा दावा आहे की तिचा पती मागच्या 4 महिन्यांपासून तरुणीसोबत आहे. महिलेने 12 तासांत पतीला 2 वेळा विदेशी तरुणीसोबत पकडले. तथापि, पत्नीने पोलिसांत अद्याप FIR दाखल केली नव्हती.  

- सूत्रांनुसार, हे प्रकरण अहमदाबादच्या शिवरंजनी परिसरातील साथ-संगाथ सोसायटीतील आहे.
- महिलेने पतीला विदेशी तरुणीसोबत रंगेहाथ पकडले. पकडल्यावर पती म्हणाला, 'ही माझी फ्रेंड आहे. पत्नीला माझ्या कुटुंबासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. मलाही दूर राहण्यासाठी सांगते. मला घरच्यांसोबत राहायचे आहे. यामुळे ती मला त्रास देते. जेव्हा मी फ्रेश होण्यासाठी गेलो, तेव्हा माझी पत्नी फ्लॅटवर पोहोचली. मी तर तिला एवढेही म्हणालो की, माझे पाहिजे तर मेडिकल चेकअप करून घे, सत्य काय ते समोर येईल.'

महिला म्हणाली, 'मी मागच्या 4 महिन्यांपासून वेगळी राहतेय. पती दररोज दारू प्राशन करून मारहाण करतो. त्याचे इतर महिलांशी संबंध आहेत. गतरात्री मी फ्लॅटवर सामान घेण्यासाठी गेलो होतो, पाहिले तर पती विदेशी तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत होता. मी गुपचूप तेथून निघून आले. मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा मी सोसायटीच्या चेअरमनशी बोलले. मला कळले की, ती तरुणी अजूनही फ्लॅटमध्येच आहे. मग मी पुन्हा फ्लॅटवर गेले, पाहिले तेव्हा तरुणी अर्धनग्नावस्थेत होती. यानंतर मी पोलिसांना बोलावले.'
- तथापि, महिलेने पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवली नाही. परंतु ती पतीचे मेडिकल चेकअप करण्यासाठी तयार आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित फोटोज व शेवटी व्हिडिओ... 

 

बातम्या आणखी आहेत...